भुकंपासारख्या तीव्र धक्क्यांनी अख्खे गाव हादरले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 06:00 PM2019-05-17T18:00:33+5:302019-05-17T18:07:33+5:30

हा भुकंप नसून गावाशेजारून गेलेल्या समृद्धी महामार्गासाठी जमिनीखाली केलेल्या ‘ब्लास्टिंग’चा परिणाम असल्याचे कळल्यानंतर गावकºयांना हायसे वाटले.

The whole village was shocked like earthquacke due to blasting | भुकंपासारख्या तीव्र धक्क्यांनी अख्खे गाव हादरले!

भुकंपासारख्या तीव्र धक्क्यांनी अख्खे गाव हादरले!

Next
ठळक मुद्देनागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग निर्मितीचे काम सद्या जोरासोरात सुरू झाले आहे जमिनीला छीद्र पाडून त्यात बारूद भरलेले तोटे टाकून ब्लास्टिंग केली जात आहे. त्याची झळ पांगरी महादेव, शेंदूरजना मोरे यासह इतर काही गावांना बसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कुणी गावाच्या पारावर; तर कुणी पानटपरीवर गप्पा मारण्यात व्यस्त, काही मंडळी घरात बसलेली, महिला स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या असतानाच अचानकपणे तीव्र भुकंपाची अनुभूती होत अख्खे गाव हादरले. या विचित्र घटनेमुळे एकच धावपळ होऊन गावातील प्रत्येकजण हादरला. मात्र, हा भुकंप नसून गावाशेजारून गेलेल्या समृद्धी महामार्गासाठी जमिनीखाली केलेल्या ‘ब्लास्टिंग’चा परिणाम असल्याचे कळल्यानंतर गावकºयांना हायसे वाटले. शेंदूरजना मोरे (ता.मंगरूळपीर) या गावात घडलेल्या या प्रकाराची परिसरात चांगलीच चर्चा होत आहे.
जिल्ह्यातील ५२ गावांमधून गेलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग निर्मितीचे काम सद्या जोरासोरात सुरू झाले आहे. यादरम्यान जमिनीला छीद्र पाडून त्यात बारूद भरलेले तोटे टाकून ब्लास्टिंग केली जात आहे. जमीन पोकळ करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या या कामामुळे मात्र बºयाच अंतरापर्यंतची जमीन हादरत असून त्याची झळ पांगरी महादेव, शेंदूरजना मोरे यासह इतर काही गावांना बसत आहे. १६ मेच्या सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास असाच प्रकार घडला. मात्र, त्याबाबत पूर्णत: अनभिज्ञ असलेल्या गावकºयांमध्ये गावात मोठ्या स्वरूपातील भुकंपच झाल्याची चर्चा व्हायला लागली. शेंदूरजना मोरे येथील या घटनेची वार्ता परिसरातील इतर गावांमध्येही वाºयासारखी पसरली. दरम्यान, समृद्धी महामार्ग निर्मितीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी जावून काही लोकांनी प्रत्यक्ष चौकशी केल्यानंतर तो भुकंप नसून जमिनीखाली करण्यात येत असलेल्या ‘ब्लास्टिंग’चा परिणाम असल्याचे उघड झाल्यानंतर गावकºयांना मोठा दिलासा मिळाला.

Web Title: The whole village was shocked like earthquacke due to blasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.