देव येतो का घ्यायला? ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन उत्पादक धास्तावला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:46 AM2021-09-21T04:46:52+5:302021-09-21T04:46:52+5:30

००००००००००००००००००० वातावरणामुळे गतवर्षीच्या पुनरावृत्तीची भीती जिल्ह्यात गतवर्षी सोयाबीनची काढणी झाली असताना अवकाळी पावसाने धडाका लावला. त्यामुळे जवळपास ६ हजारांपेक्षा ...

Why does God come to take? Soybean growers panicked due to cloudy weather! | देव येतो का घ्यायला? ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन उत्पादक धास्तावला!

देव येतो का घ्यायला? ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन उत्पादक धास्तावला!

Next

०००००००००००००००००००

वातावरणामुळे गतवर्षीच्या पुनरावृत्तीची भीती

जिल्ह्यात गतवर्षी सोयाबीनची काढणी झाली असताना अवकाळी पावसाने धडाका लावला. त्यामुळे जवळपास ६ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. आता यंदाही हे पीक काढणीवर असताना हवामान खात्याने पुढील ५ दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे गतवर्षीची पुनरावृत्ती होण्याची भीती निर्माण झाली आहे.

०००००००००००००००००००

शेतकऱ्यांची काढणीसाठी धावपळ

हवामान खात्याने पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यात सोयाबीनच्या शेंगा परिपक्व होऊन सुकत आहेत. जोरदार पाऊस पडल्यास सोयाबीनच्या शेंगा गळण्याची, फुटण्याची, त्याला अंकुर येण्याची भीती आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी सोयाबीन सुकण्यापूर्वीच काढण्यासाठी धावपळ सुरू झाल्याचे दिसत आहे.

००००००००००००००००००००००

कोट: सोयाबीनचे पीक कापणीवर आले आहे. शेंगा परिपक्व झाल्या असून, या पिकापासून विक्रमी उत्पादनाची अपेक्षा आहे; परंतु गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने नुकसान होण्याची भीती वाढली आहे.

- गजानन हळदे,

शेतकरी, इंझोरी

००००००००००००००

कोट: गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान होण्याची भीती आहे. हे पीक कापणीच्या स्थितीत आहे. कडक उन्ह पडण्याची आम्हाला अपेक्षा असताना ढगाळ वातावरणाने चिंता वाढविली आहे.

- सुरेश गावंडे,

शेतकरी

००००००००००००००००००००

जिल्ह्यातील सोयाबीनचे तालुकानिहाय क्षेत्र

तालुका - सोयाबीनचे क्षेत्र

वाशिम - ६१०१४.७४

रिसोड - ५६६३९.००

मालेगाव - ५७७०२.००

मंगरुळपीर - ४७५०६.१६

मानोरा - ३०००७.९४

कारंजा - ४९८२३.००

Web Title: Why does God come to take? Soybean growers panicked due to cloudy weather!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.