फ्लॅटमध्येही पेटवायच्या का चुली; गॅस पुन्हा २५ रुपयांनी महागला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:43 AM2021-09-03T04:43:53+5:302021-09-03T04:43:53+5:30

वाशिम : महागाई नवनवा उच्चांक गाठत असून, गॅस सिलिंडरच्या किमतीत एक सप्टेंबरला पुन्हा २५ रुपयांची वाढ झाली. दर महिन्याला ...

Why even in a flat stove; Gas goes up by Rs 25 again | फ्लॅटमध्येही पेटवायच्या का चुली; गॅस पुन्हा २५ रुपयांनी महागला!

फ्लॅटमध्येही पेटवायच्या का चुली; गॅस पुन्हा २५ रुपयांनी महागला!

Next

वाशिम : महागाई नवनवा उच्चांक गाठत असून, गॅस सिलिंडरच्या किमतीत एक सप्टेंबरला पुन्हा २५ रुपयांची वाढ झाली. दर महिन्याला गॅसच्या किमतीत वाढ होत असल्याने ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटत आहेत. दरवाढीमुळे शहरी भागातील फ्लॅटमध्येही चुली पेटवायच्या का? असा संतप्त प्रश्न सर्वसामान्यांसह गृहिणींमधून उपस्थित केला जात आहे.

इंधन दरवाढीबरोबरच स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतीलाही नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. दर महिन्याच्या १ आणि १५ तारखेला सरकारी तेल कंपन्या इंधन दरांबरोबरच सिलिंडरच्या दरांचाही आढावा घेतात. १ सप्टेंबरला सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी महागला आहे. १ मार्च २०१४ रोजी घरगुती वापराच्या सिलिंडरची किंमत ४१० रुपये होती. सात वर्षांत सिलिंडरची किंमत दुप्पट झाल्याने याची झळ सर्वसामान्यांना बसत आहे.

००००००००००००००००००००

दर महिन्याला नवा उच्चांक (ग्राफिक्स)

दिनांक दरवाढ सिलिंडरचा दर

१ जानेवारी - २० ६९४

४ फेब्रुवारी - २५ ७१९

१५ फेब्रुवारी - ५० ७६९

१ मार्च - ५० ८१९

१ एप्रिल -- ९ ८१०

१ मे - ०० ८१०

१ जून - २० ८३०

१ जुलै - २० ८५४

ऑगस्ट २६ ८८०

१ सप्टेंबर - २५ ९०५

००००००

सबसिडी किती भेटते हो भाऊ?

एकिकडे सिलिंडरच्या किमती सातत्याने वाढत असताना मे २०२० पासून सबसिडी मिळणे जवळपास बंद झाल्यासारखेच आहे. सद्यस्थितीत वाशिम येथे सिलिंडरचे दर ९०५ रुपये झाले असताना सबसिडी केवळ ४ ते ५ रुपयेच मिळते. सबसिडी मिळत नसल्याचा फटकाही सर्वसामान्यांना बसत आहे.

०००००००

व्यावसायिक सिलिंडरही महाग (बॉक्स)

इंधन दरवाढीबरोबरच घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीतही वाढ होत आहे. ऑगस्ट महिन्यात व्यावसायिक सिलिंडरची किमत १,६४९ होती. आता वाशिम येथे व्यावसायिक सिलिंडरची किमत १,७०३ रुपये झाली आहे.

००००००००००००००

महिन्याचे गणित कोलमडले (दोन गृहिणींच्या फोटोसह प्रतिक्रिया)

कोट

दिवसेंदिवस महागाई नवीन उच्चांक गाठत आहे. सर्वच क्षेत्रात महागाई झपाट्याने वाढत असल्याने सर्वसामान्यांनी जगावे कसे? असा प्रश्न आहे. आता घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याने गृहिणींचे महिन्याचे गणितही कोलमडत आहे.

- हर्षदा दिलीप देशमुख

गृहिणी, वाशिम

००००००००००००

केंद्र सरकारने इंधन, सिलिंडरच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. घरगुती सिलिंडरच्या किमतीत वाढ होत असल्याने ग्रामीण भागात सर्वसामान्य कुटुुंब पुन्हा चूल पेटवित आहेत. शहरी भागातील सर्वसामान्य गृहिणींनीदेखील चुली पेटवाव्या का?

- शुभदा मुकुंद नायक

गृहिणी, वाशिम

Web Title: Why even in a flat stove; Gas goes up by Rs 25 again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.