प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:46 AM2021-08-28T04:46:03+5:302021-08-28T04:46:03+5:30
............... शहरांतर्गत रस्ता कामांना सुरुवात वाशिम : शहरातील अंतर्गत रस्त्यांची डागडुजी व काही रस्त्यांच्या नूतनीकरणास सुरुवात झालेली आहे. यामुळे ...
...............
शहरांतर्गत रस्ता कामांना सुरुवात
वाशिम : शहरातील अंतर्गत रस्त्यांची डागडुजी व काही रस्त्यांच्या नूतनीकरणास सुरुवात झालेली आहे. यामुळे वाहतूक विस्कळीत होत असून, रस्त्यांची कामे गतीने पूर्ण करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी होत आहे.
...............
भाजीपाल्याच्या दरात विक्रमी घसरण
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून सर्वच प्रकारच्या भाजीपाल्याच्या दरात विक्रमी घसरण झालेली आहे. शुक्रवारी फुलकोबी, पत्ताकोबी, टमाटर, दोडकी, वांगी, पालक, मेथी, कोथिंबीरचे दर किलोमागे १५ ते २० रुपयांनी कमी झाल्याचे पाहावयास मिळाले.
...............
नियमांचे पालन करण्याचे आवाहन
वाशिम : शहरात दैनंदिन कोरोना बाधित आढळणाऱ्यांचे प्रमाण नगण्य स्वरूपात आहे. असे असले तरी तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरता नागरिकांनी बेफिकीर न राहता कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. मधुकर राठोड यांनी केले.
...............
शिवभक्त कावड यात्रेला रवाना
वाशिम : शहरातील माहुरवेस येथील शिवभक्त युवकांनी २६ सप्टेंबर रोजी कावड यात्रा घेऊन हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध शिवलिंग औंढा नागनाथकडे प्रस्थान केले. यावेळी परिसरातील नागरिकांनी संबंधित युवकांचा सत्कार केला.