एस.टी.मधील ‘वायफाय’ तकलादू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 01:51 AM2017-08-11T01:51:21+5:302017-08-11T01:51:52+5:30

वाशिम: एस.टी.ने प्रवास करणार्‍या नागरिकांच्या भ्रमणध्वनीला वायफायची मोफत सुविधा देण्याचा उपक्रम परिवहन महामंडळाने हाती घेतला. त्यानुसार, अकोला विभागातील आगारांमध्ये २६५ बसमध्ये वायफाय इन्स्ट्रूमेंटदेखील बसविण्यात आले; मात्र या अंतर्गत केवळ ठराविक मालिका पाहण्याची सोय करण्यात आली असून, व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर यासारख्या महत्त्वाच्या सुविधांना वगळण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. 

'Wifi' in ST! | एस.टी.मधील ‘वायफाय’ तकलादू!

एस.टी.मधील ‘वायफाय’ तकलादू!

Next
ठळक मुद्देप्रवाशांमध्ये नाराजी सुविधा ‘हायटेक ’असण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम: एस.टी.ने प्रवास करणार्‍या नागरिकांच्या भ्रमणध्वनीला वायफायची मोफत सुविधा देण्याचा उपक्रम परिवहन महामंडळाने हाती घेतला. त्यानुसार, अकोला विभागातील आगारांमध्ये २६५ बसमध्ये वायफाय इन्स्ट्रूमेंटदेखील बसविण्यात आले; मात्र या अंतर्गत केवळ ठराविक मालिका पाहण्याची सोय करण्यात आली असून, व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर यासारख्या महत्त्वाच्या सुविधांना वगळण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. 
परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसने नागरिकांनी प्रवास करावा, यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जानेवारी २0१७ पासून टप्प्याटप्प्याने राज्यभरातील बसेसमध्ये वायफाय सुविधा देण्यासाठी पुढाकार घेतला. या अंतर्गत प्रत्येक एस.टी. बसमध्ये वाय-फाय तंत्रज्ञानावर आधारित मनोरंजनाची सेवा प्रवाशांना घेता येईल. त्यासाठी बसमध्ये हॉट स्पॉट बसविला जाईल. त्याद्वारे प्रवाशांना मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपट, मालिका, गाणी, काटरून्स मोबाइलवर पाहता येतील, असे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र अकोला विभागातील सर्वच बसेसमध्ये वायफायच्या माध्यमातून केवळ ‘वुट गो डॉट कॉम’ या वेबसाईटवर गेल्यानंतर तीन ते चार मराठी चित्रपट, काही हिंदी मालिका आणि दूरचित्रवाहिन्यांवरील निवडक मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहता येणे शक्य होत आहे. विशेष म्हणजे म्हणायला ‘वायफाय’ची सुविधा आहे; पण याअंतर्गत मोबाइलमधील व्हॉट्सअपदेखील सुरू ठेवण्याची सोय नसल्याने ही सुविधा बहुतांशी तकलादू ठरत असल्याचे दिसून येत आहे. 

अकोला विभागातील आगारांतर्गत २६५ एस.टी.बसेसमध्ये वायफायची सुविधा पुरविण्यात आली आहे. याअंतर्गत मोबाइलवर सुरूवातीच्या टप्प्यात कमी प्रमाणात कार्यक्रम दिसत असले तरी भविष्यात त्यात निश्‍चितपणे सुधारणा केल्या जातील.
- अमोल पलिंगे, विभाग नियंत्रक, एस.टी.परिवहन महामंडळ, अकोला

एस.टी.बसमध्ये वायफायची सुविधा मिळणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर खरे तर आनंद झाला होता. प्रत्यक्षात मात्र ही सुविधा अगदीच कमकुवत ठरत असून, ठराविक आणि तेच ते कार्यक्रम पाहण्याची सुविधा या अंतर्गत देण्यात आल्याने याबाबत नाराजी आहे. 
- प्रवीण गोटे, प्रवासी, वाशिम

मी दैनंदिन एस.टी.ने मंगरूळपीर-वाशिम प्रवास करतो. मोबाइलमध्ये एस.टी.चे वायफाय अँक्टिव्हेट केलेले आहे; परंतु ते कामचलावू असून, परिवहन महामंडळाने यात सुधारणा करायला हव्या.
- संतोष पवार, प्रवासी, मंगरूळपीर

Web Title: 'Wifi' in ST!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.