कोवळ्या पिकांवर वन्यप्राण्यांचा ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 03:42 PM2018-11-16T15:42:23+5:302018-11-16T15:42:48+5:30

वाशिम: जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी ४० टक्क्यांहून अधिक उरकली असून, उगवलेल्या हरभरा आणि गहू पिकांवर माकडे, हरीण हे वन्यप्राणी ताव मारत असल्याने शेतकºयांचे अतोनात नुकसान होत आहे.

Wild animals eat Crops in fields in washim district | कोवळ्या पिकांवर वन्यप्राण्यांचा ताव

कोवळ्या पिकांवर वन्यप्राण्यांचा ताव

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी ४० टक्क्यांहून अधिक उरकली असून, उगवलेल्या हरभरा आणि गहू पिकांवर माकडे, हरीण हे वन्यप्राणी ताव मारत असल्याने शेतकºयांचे अतोनात नुकसान होत आहे. या पीक नुकसानासाठी वनविभागाने आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
जिल्ह्यात ९२ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी नियोजित करण्यात आली असून, सद्यस्थितीत ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर पिकांची पेरणीही झाली आहे. गहू आणि हरभरा पिक वितभर वाढले असताना या कोवळ्या पिकांवर माकडे आणि हरणांचे कळप ताव मारू न शेतकºयांचे नुकसान करीत आहेत. भारनियमनाने त्रस्त असलेला शेतकीर रात्ररात्र जागून पाणी देत पिकांना वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असताना वन्यप्राणी सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास कळपाने या पिकांवर ताव मारताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी वैतागले असून, उभ्या पिकांचे नुकसान होत असतानाही त्यांना ती वाचविणेही कठीण झाले आहे. या पीक नुकसानाची पाहणी करू शेतकºयांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

अडीच एकरातील गहू, हरभरा फस्त
वाशिम तालुक्यात दगड उमरा परिसरात रब्बीची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली असून, ही पिके आता बहरत असताना वन्यप्राण्यांनी पिकांत धुमाकूळ घातला आहे. शिवारातील एका शेतकºयाने अडिच एकरात पेरलेला हरभरा आणि गहु पिक माकडे आणि हरणांच्या कळपाने पूर्ण फस्त केले आहे. या नुकसानाची वनविभागाने पाहणी करून नूकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयाने केली आहे.

Web Title: Wild animals eat Crops in fields in washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.