वन्यप्राणी करीत आहे कोवळ्या पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:27 AM2021-07-11T04:27:33+5:302021-07-11T04:27:33+5:30

शेतकरी शेतात दिवसभर काम करत असतात. रात्रीला वन्यप्राणी रोही हे पिकांची नासाडी करून शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त करीत आहेत. वारंवार ...

Wildlife is causing damage to cobblestones | वन्यप्राणी करीत आहे कोवळ्या पिकांचे नुकसान

वन्यप्राणी करीत आहे कोवळ्या पिकांचे नुकसान

Next

शेतकरी शेतात दिवसभर काम करत असतात. रात्रीला वन्यप्राणी रोही हे पिकांची नासाडी करून शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त करीत आहेत. वारंवार वनविभागाकडे तक्रारी केल्या तरी मात्र काही फरक पडत नाही. शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून महागडे बियाणे, खते खरेदी करून लागवड केली. आता जमिनीतून अंकूर बाहेर निघाले असून अंकुरित पिकांची वाढ होत असतानाच वन्यप्राणी या पिकांची नासाडी करीत आहेत. काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून महागडे बियाणे पेरले त्यात वन्यप्राण्यांचा त्रास वाढला आहे. वनविभागही वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात कमी पडत आहे. त्यामुळे वन्यप्राणी पिकांची सतत नासाडी करीत आहे. शासनाने तत्काळ शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Wildlife is causing damage to cobblestones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.