रानडुक्कर, रोहींनी केले मक्याचे पीक फस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 01:43 PM2019-07-31T13:43:01+5:302019-07-31T13:43:09+5:30
वाशिम : आधीच नैसर्गिक संकटांमुळे जेरीस आलेल्या शेतकऱ्यांसमोर वन्यप्राण्यांकडून शेतमालाच्या होणाºया नासाडीचे संकटही उभे ठाकले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आधीच नैसर्गिक संकटांमुळे जेरीस आलेल्या शेतकऱ्यांसमोर वन्यप्राण्यांकडून शेतमालाच्या होणाºया नासाडीचे संकटही उभे ठाकले आहे. वाशिमपासून जवळच असलेल्या तामसी फाट्यानजिकच्या शेतात २९ जुलैच्या रात्री रानडुक्कर आणि रोहिंनी अक्षरश: हैदोस घालून शेतात बहरलेले मक्याचे पीक फस्त केल्याचा प्रकार घडला.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, तामसी फाट्यानजिक सामाजिक कार्यकर्ते तथा गीर गो-पालक रवी मारशेटवार यांची पाच एकर शेती आहे. जांभरूण परांडे या गावातील शेतकऱ्यांचीही याच शिवारात शेती असून गत काही दिवसांपासून उभ्या पिकात दिवसा व रात्री रानडुकरांचे कळप शिरत असून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करित आहेत. २९ जुलैच्या रात्रीदेखील रानडुकरांच्या भल्यामोठ्या कळपाने रवी मारशेटवार यांच्या शेतातील मका आणि हळद पीक उध्वस्त केले. मारशेटवार यंच्या शेताला लागून असलेल्या रामकिसन काळबांडे याच्या शेतातही या वन्यप्राण्यांनी शिरकाव करून डाळींबाच्या बागेत हैदोस घातला. तथापि, वन्यप्राण्यांकडून शेतात होणाºया नुकसानाची वन विभागाने तुटपुंज्या स्वरूपात भरपाई देण्यापेक्षा वन्यप्राण्यांचा कायम स्वरुपी बंदोबस्त करावा. यामुळे किमान गोरगरिब शेतकºयांच्या तोंडचा घास तरी हिरावला जाणार नाही, अशी मागणी रवी मारशेटवार यांनी केली आहे.
(प्रतिनिधी)