वन्यप्राण्यांचा हैदोस; ४० एकरातील पिकांचे नुकसान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 03:44 PM2019-10-30T15:44:58+5:302019-10-30T15:47:15+5:30
दगड उमरा व पांडवउमरा परिसरातील जवळपास ४० एकरातील पिकांची नासाडी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वन्यप्राण्यांनी हैदोस घालत वाशिम तालुक्यातील दगड उमरा व पांडवउमरा परिसरातील जवळपास ४० एकरातील पिकांची नासाडी केली आहे.
दगड उमरा शिवारात आशादेवी रामेशचंद्र लाहोटी, कपिल लाहोटी, यांच्या १० एकर शेतातील ज्वारीचे पीक रानडुक्कर, रुई या वन्यप्राण्यांनी भुईसपाट केले आहे. याप्रमाणेच मनीष बाटुलवार, तुळसीराम राऊत, मथुरा वाणी, पुष्पा खडके, राजे, सतीश करवा, कुशल लाहोटी, सचिन ठाकरे, उत्तम जाधव, रामदास रोडे, सुरेश ठाकरे, महादेव घोंगडे, संतोष काकडे आदी शेतकºयांच्या जवळपास ३० एकरातील पिकांचेही वन्यप्राण्यांनी नुकसान केले आहे. शासनाच्यावतीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकºयांनी केली. दरम्यान, वाशिम तालुक्यातील पांडवउमरा येथील परसराम जावळे यांच्या कळंबा महाली शिवारातील दोन करातील ज्वारीचे रानडुकराने नुकसान झाले. वनविभागाने पाहणी करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परसराम जावळे यांनी केली.