राणी पदमावती चित्रपट प्रदर्शित झाल्यास तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 04:31 PM2017-10-26T16:31:16+5:302017-10-26T16:32:44+5:30

वाशिम : राजपुत क्षत्रीय समाजविरोधी राणी पदमीनी चित्रपटामध्ये चुकीचा काल्पनिक इतिहास रंगवून समाज बांधवांचय भावना दुखावल्या आहेत. याबाबत राजपूत क्षत्रिय समाजाच्यावतिने २६ आक्टोंबर रोजी येथील विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेवून चित्रपट प्रदर्शित झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. 

will do agitation if rani padmawati cenema release | राणी पदमावती चित्रपट प्रदर्शित झाल्यास तीव्र आंदोलन

राणी पदमावती चित्रपट प्रदर्शित झाल्यास तीव्र आंदोलन

Next
ठळक मुद्देराजपूत क्षत्रिय समाजाचा पत्रकार परिषदेत इशारा


वाशिम : राजपुत क्षत्रीय समाजविरोधी राणी पदमीनी चित्रपटामध्ये चुकीचा काल्पनिक इतिहास रंगवून समाज बांधवांचय भावना दुखावल्या आहेत. याबाबत राजपूत क्षत्रिय समाजाच्यावतिने २६ आक्टोंबर रोजी येथील विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेवून चित्रपट प्रदर्शित झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. 

संजय भंसाली यांनी रानी पदमावती यांच्या नावावर चित्रपट काढला असून या चित्रपटामध्ये काही आक्षेपार्ह मुद्दे  आहेत. राजपुत समाजाच्या नव्हे तर सर्वच हिंदु भगीनींचा अपमान केला  आहे. राणी पदमावती चित्तोडगडच्या महाराणी होत्या व संपूर्ण भारतात आपल्या  शिल रक्षणाकरिता १६००० हजार स्त्रीयासोबत अग्नीमध्ये प्रवेश करुन आपल्या स्त्री पतीव्रतेचे  प्रतिक संपूर्ण इतिहासामध्ये त्यांची नोंद आहे. असे असतांना चित्रपटात मसाला भरुन प्रदर्शित करण्याचा डाव आखला आहे. हा प्रकार कदापी खपवून घेतला जाणार नसल्याचे राजपूत क्षत्रिय समाजाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी लखनसिंह ठाकुर यांनी भाजपा प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे , जयकुमार रावल, आ.सुजीतसिंह ठाकुर यांच्याशी चर्चा केली त्यावेळी दानवे यांनी सदर चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याचे आश्वासन दिले. यावेळी क्षत्रीय समाजाची राष्ट्रीय राजपुत करनी सेना, अखिल भारतीय क्षत्रीय महासभा, महाराणा ब्रिगेड,  बजरंग दल,  महाराणा राजपुत संघटना सह वाशिम येथील राजपुत संघटना, बजरंग दल , अखंड राष्ट्रवादी पार्टी अकोला, महाराणा बटालीयन वाशिमसह  महिला प्रदेश अध्यक्ष  सोनालीताई ठाकुर  , जिल्हा अध्यक्ष राजेंद्र सिंह ठाकुर , जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकुर, जिल्हा अध्यक्ष बजरंग दल मुकेशसिंह ठाकुर, जिल्हा अध्यक्ष राजपुत करनी सेना सावनसिंह चौहान,  राजपुत संघटना जिल्हा उपाध्यक्ष श्यामसिंह ठाकुर, जिल्हा उपाध्यक्ष  रणजीतसिंह ठाकुर, जिल्हा सचिव दिलीपसिंह तोमर,  किसनसिंह तोमर, किसनसिंह ठाकुर, जयेंद्रसिंह अजमीरे, अ‍ॅड.सज्जनसिंह चंदेल, मेघा लखनसिंह ठाकुर , बजरंगसिंह चंदेल, कुंदनसिंह ठाकुर,  जगमोहनसिंह ठाकुर, मनोजसिंह ठाकुर यांच्साह राजपुत क्षत्रीय समाज पदाधिकारी, कार्यकर्ते व बांधवांची उपस्थिती होती.

Web Title: will do agitation if rani padmawati cenema release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.