मृत्यूनंतरही जग पाहणार, ५१२ जणांना नेत्रदानाचा संकल्प
By दिनेश पठाडे | Published: September 12, 2023 01:49 PM2023-09-12T13:49:44+5:302023-09-12T13:50:34+5:30
अंधत्वाचे प्रमाण करण्याच्या हेतूने व नेत्रदाळ चळवळ अधिक वृद्धीगंत करण्याचा प्रयत्न या अंतर्गत करण्यात आला.
वाशिम : मृत्यूनंतरही आपले नेत्ररूपी अवशेष शिल्लक राहून हे सुंदर जग पाहू शकू या इच्छेने नेत्रदान पंधरावाड्यात जिल्ह्यातील ५१२ व्यक्तींनी संमतीपत्र भरुन मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला. मरणोत्तर नेत्रदान काळाची गरज बनली आहे.
एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन व्यक्तीच्या जीवनात प्रकाश निर्माण होतो. नेत्रदानासाठी नागरिकांनी, पुढे यावे, यासाठी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत नुकताच नेत्रदान पंधरवाडा राबविण्यात आला. त्या अंतर्गत, नेत्रदान महादान अंतर्गत जनजागृती, नेत्र तपासणी, मरणोत्तर नेत्रदान घडवून आणणे, नेत्रदानाचा संकल्प करणे, कॉर्नियल ब्लाईंडमुळे होणारे अंधत्व टाळणे याबाबत जनजागृती करण्यात आली. अंधत्वाचे प्रमाण करण्याच्या हेतूने व नेत्रदाळ चळवळ अधिक वृद्धीगंत करण्याचा प्रयत्न या अंतर्गत करण्यात आला.
नेत्र बुब्बुळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून उपलब्धता कमी प्रमाणात असल्याने अंधत्वाचे प्रमाण वाढले आहे. नेत्रदानाचा उपयोग सर्वच अंध लोकांसाठी होऊ शकत नाही, ज्या रुग्णांना काळ्या बुब्बुळावर टिक आहे, त्यांचा रेटिना, रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी या बाबी निरोगी आहेत, अशा रुग्णांना या नेत्रदानाचा उपयोग होतो. यांना कॉर्निअल ब्लार्इंडनेस असे म्हणतात. दरम्यान, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनील कावरखे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प करुन संमतीपत्र भरुन दिले.