शेवटच्या श्वासापर्यंत शिक्षण क्षेत्रात कार्य करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:47 AM2021-09-15T04:47:52+5:302021-09-15T04:47:52+5:30

यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबिर यामध्ये जवळपास १०० बॅगच्यावर रक्तदान करून यशस्वी केले. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप ...

Will work in the field of education till his last breath | शेवटच्या श्वासापर्यंत शिक्षण क्षेत्रात कार्य करणार

शेवटच्या श्वासापर्यंत शिक्षण क्षेत्रात कार्य करणार

Next

यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबिर यामध्ये जवळपास १०० बॅगच्यावर रक्तदान करून यशस्वी केले. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. तसेच राजू निंबकर नावाच्या मुलाला शस्त्रक्रियेसाठी मदत करण्यात आली. याप्रसंगी आमदार सरनाईक म्हणाले की, समाजातील गोरगरीब, शेतमजूर, तांडा वस्तीमधील पाल्यांच्या शिक्षणासाठी कार्य करीत राहीन. त्याचबरोबर कोणत्याही शिक्षकांवर अन्याय होणार नाही तचेच शिक्षकांच्या समस्या बद्दल अविरत प्रयत्नशील राहून शेवटच्या श्वासापर्यंत शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहीन, असे प्रतिपादन केले. याप्रसंगी सरनाईक परिवारातील अनिताताई सरनाईक, अरुणराव सरनाईक मंजूषा सरनाईक, स्नेहदीप सरनाईक, देवयानी सरनाईक, रघुवीर सरनाईक उपस्थित होते. शिवाजी परिवारातील संचालक मंडळ, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा वाघ व दीपक पाचरणे यांनी केले, तर आभार प्रा. भास्कर सोनुने यांनी मानले. (वा.प्र.)

Web Title: Will work in the field of education till his last breath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.