वादळी वाऱ्याचा तडाखा, घरावरील पत्रे उडाली, वृक्ष उन्मळून पडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 06:49 PM2021-05-27T18:49:41+5:302021-05-27T18:50:59+5:30
Washim News: वादळवाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले, झाडे उन्मळून पडली.
कोठारी : मंगरूळपीर तालुक्यातील कोठारी परिसरात गुरूवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वादळवाºयामुळे गावकºयांची एकच धांदल उडाली. काही नागरिकांच्या घरावरील टिन उडून गेले तर झाडे उन्मळून पडली.
वातावरणात अचानक बदल होऊन कोठारी परिसरात गुरूवारी सायंकाळच्या सुमारास वादळवाºयासह पाऊस पडला. वादळवाºयाचा जोर एवढा प्रचंड होता की महावितरणच्या वीज वाहिणीचे मोहरी ते गिंभा परिसरातील चार टॉवर तुटून पडले. चेहल, धानोरा, मोहरी, मंगळसा, स्वासीन, गींभा, कवठळ, बोरव्हा, चांधई व कोठारी परीसरात अनेक झाडे उन्मळून पडली. काहींच्या घरावरील टिन उडून गेल्याने नागरिकांची एकच धांदल उडाली.कोठारी परीसरात भुईमुग, मुंग व उन्हाळी ज्वारीची काढनीची लगबग सुरू असून, वादळीवारा आणि पावसामुळे शेतकºयांची धावपळ झाली.