वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत!
By admin | Published: May 29, 2017 01:16 AM2017-05-29T01:16:51+5:302017-05-29T01:16:51+5:30
आसेगाव पो.स्टे: मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव परिसरात रविवारी सायंकाळी ६ ते ६.३० वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस आलेल्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव पो.स्टे: मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव परिसरात रविवारी सायंकाळी ६ ते ६.३० वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस आलेल्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले.
आसेगाव परिसरात सायंकाळी ४ वाजतापासून वातावरणात बदल झाला आणि आकाशात ढग जमले. त्यानंतर दोन तासांतच वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यामुळे काही घरावरील टीन उडून गेले. त्यामुळे लोकांची तारांबळ उडाली तब्बल अर्धा तास वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. त्यामुळे लोकांना आपला बचाव करावा लागला. दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे नांदगाव ते आसेगाव मार्गावरील धोकादायक बाभळीचे झाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही.