राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत वाशिमच्या उपअभियंत्यांची चमकदार कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 03:03 PM2019-01-18T15:03:13+5:302019-01-18T15:09:06+5:30

वाशिम : गांधीनगर (गुजरात) येथे पार पडलेल्या अखिल भारतीय नागरी सेवा जलतरण स्पर्धेत बटरप्लाय प्रकारात महाराष्ट्र संघाकडून खेळलेल्या ए.एम. खान यांनी नवी दिल्लीच्या संघाला पराभूत करीत विजेतेपद पटकाविले.

Wishful performances of the Deputy ingineer in the National Swimming Championship | राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत वाशिमच्या उपअभियंत्यांची चमकदार कामगिरी

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत वाशिमच्या उपअभियंत्यांची चमकदार कामगिरी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गांधीनगर (गुजरात) येथे पार पडलेल्या अखिल भारतीय नागरी सेवा जलतरण स्पर्धेत बटरप्लाय प्रकारात महाराष्ट्र संघाकडून खेळलेल्या ए.एम. खान यांनी नवी दिल्लीच्या संघाला पराभूत करीत विजेतेपद पटकाविले. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात उपअभियंता म्हणून कार्यरत असलेले ए.एम. खान यांचा या चमकदार कामगिरीबद्दल १८ जानेवारी रोजी जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी महासंघाने सत्कार केला.
आॅल इंडिया  सिव्हिल सर्व्हिसेस अंतर्गत गांधीनगर (गुजरात) येथे शासकीय अधिकारी संवर्गातील जलतरण स्पर्धा पार पडल्या असून, यामध्ये देशातील विविध राज्याचे संघ सहभागी झाले होते. बटरप्लाय या प्रकारात महाराष्ट्र संघात ए.एम. खान यांची निवड झाली होती. अंतिम सामन्यात नवी दिल्लीच्या स्पर्धकाचा पराभव करीत खान यांनी विजेतेपद पटकाविले. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत वाशिमसारख्या छोट्याशा जिल्ह्यातील अधिकाºयाने विजेतेपद पटकाविणे ही बाब जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात कौतुकास्पद मानली जात आहे. खान यांनी यापूर्वीदेखील राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धा, सागरी जलतरण स्पर्धेत मालवण, रत्नागिरी येथे ३ किमी अंतर, संक रॉक ते गेट वे आॅफ इंडिया, मुंबई असे ५ किमी अंतर, भारतीय नौसेना ट्रेनिंग सेंटर ते प्रांज रिफ कुलाबा मुंबई असे ६ किमी अंतर स्पर्धेत उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे. राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद पटकावून देणाºया खान यांचा महाराष्ट्र शासनाने राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते गौरव केलेला आहे. या चमकदार कामगिरीबद्दल वाशिम येथे १८ जानेवारीला जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी महासंघाने उपअभियंता खान यांचा गौरव केला.

Web Title: Wishful performances of the Deputy ingineer in the National Swimming Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.