वाशिम जिल्हा परिषदेचा ४३ लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 05:07 PM2018-03-21T17:07:16+5:302018-03-21T17:07:16+5:30
वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीचे सभापती चंद्रकांत ठाकरे यांनी २१ मार्च रोजी अर्थसंकल्पीय सभेत सन २०१८-१९ चे सुधारित अंदाजपत्रक ४३ लाख ४३ हजार ७८२ रुपये शिलकीचे सादर केले.
वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीचे सभापती चंद्रकांत ठाकरे यांनी २१ मार्च रोजी अर्थसंकल्पीय सभेत सन २०१८-१९ चे सुधारित अंदाजपत्रक ४३ लाख ४३ हजार ७८२ रुपये शिलकीचे सादर केले. या अंदाजपत्रकावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर बहुमताने मंजूर झाले.
जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात बुधवारी अर्थसंकल्पीय सभा पार पडली. पिठासिन अधिकारी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख होत्या. व्यासपिठावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीणा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडनीस, सभापती सर्वश्री विश्वनाथ सानप, पानुताई जाधव, सुधीर पाटील गोळे, यमुना जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी अर्थ समितीचे सभापती चंद्रकांत ठाकरे यांनी सलग चवथ्यांदा जिल्हा परिषदेचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला. सन २०१८-१९ या वर्षात विविध मार्गाने ५ कोटी ६३ लाख ५८ हजार ७८२ रुपयांचा महसूल येणार असून, ५ कोटी ५० लाख ३८ हजार रुपये विविध विभागाच्या योजनांवर खर्च होणार असल्याचा अंदाज बांधण्यात आला. हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चेची मागणी लावून धरली. सविस्तर चर्चा झाल्यानंतर अर्थसंकल्प मंजूर झाला. बांधकाम विभागासाठी जवळपास १.७३ कोटीची तरतूद असून, शिक्षण २२ लाख रुपये, आरोग्य २५.६६ लाख रुपये, कृषी २१.६२ लाख रुपये, पशु संवर्धन ५ लाख, लघु सिंचन ५५ लाख रुपये, समाजकल्याण २७.२८ लाख, महिला व बालकल्याण १२.७२ लाख रुपये अशी तरतूद करण्यात आली आहे. यावेळी सन २०१७-१८ मधील शिलाई मशीनचे वाटप झाले नसल्याचा मुद्दा चांगलाच गाजला.