वीज जोडणी अभावी वाशिम जिल्ह्यातील बॅरेजेसची उपयोगिता शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 03:34 PM2018-02-26T15:34:58+5:302018-02-26T15:34:58+5:30
वाशिम : जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी उभारण्यात आलेल्या बॅरेजसमधून पाणी उपसा करण्यासाठी कृषिपंपांना वीज जोडणीसाठी सुमारे ९५ कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. मात्र, यासंदर्भातील प्रस्तावास अद्याप मंजुरात मिळालेली नाही.
वाशिम : जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी उभारण्यात आलेल्या बॅरेजसमधून पाणी उपसा करण्यासाठी कृषिपंपांना वीज जोडणीसाठी सुमारे ९५ कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. मात्र, यासंदर्भातील प्रस्तावास अद्याप मंजुरात मिळालेली नाही. त्यामुळे बॅरेजेसमध्ये पाणी असूनही त्याचा उपयोग घेणे अशक्य ठरत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
जिल्ह्यातील सिंचनाचा वाढलेला अनुशेष दुर करण्यासाठी विदर्भ सिंचन विकास महामंडळाने पैनगंगा नदीवरील वरुड, जुमडा, कोकलगांव, अडगांव, गणेशपूर, राजगांव, उकळीपेन, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली आणि जयपूर अशा ११ ठिकाणी ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्चून बॅरेजेसची कामे पूर्ण केली. यामुळे पैनगंगेतून कधीकाळी वाहून जाणारे पाणी अडविणे शक्य झाले असून वाशिम आणि नजिकच्या हिंगोली जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. मात्र, त्यासाठी विजेसंदर्भातील कामे देखील प्राधान्याने पूर्ण करणे क्रमप्राप्त असून यासंदर्भात महावितरणने ९५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला आहे. त्यास मंजुरातही मिळाली; परंतू निधी न मिळाल्याने पुढची कुठलीच प्रक्रिया होऊ शकली नाही.