दुचाकीत पदर अडकल्याने फास लागून महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 11:19 AM2020-04-24T11:19:50+5:302020-04-24T11:24:59+5:30

कारंजा ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Woman dies after getting stuck in two-wheeler | दुचाकीत पदर अडकल्याने फास लागून महिलेचा मृत्यू

दुचाकीत पदर अडकल्याने फास लागून महिलेचा मृत्यू

Next
ठळक मुद्दे परत जाताना तपोवन फाट्याजवळ दुचाकीच्या मागील चाकात पदर अडकला.फास लागून दुचाकीखाली पडल्याने गंभीर जखमी झाल्या.डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

कारंजा लाड : तालुक्यातील ग्राम शेलूवाडा येथील ४२ वर्षीय महिला बेबीबाई राजू मस्के ही कारंजा येथून दवाखाना करून गावी परत जात असताना दुचाकीच्या चाकात साडीचा पदर अडकून गळ्याला फास लागला आणि यामध्ये तिचा मृत्यु झाल्याची घटना २३ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान घडली.
शेलुवाडा येथील महिला बेबीताई राजू मस्के (४२) यांची तब्येत बरोबर नसल्याने त्यांनी कारंजा येथे दवाखाना केल्यानंतर परत जाताना तपोवन फाट्याजवळ दुचाकीच्या मागील चाकात पदर अडकला. यामुळे गळ्याला फास लागून दुचाकीखाली पडल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी कारंजा ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
(प्रतिनिधी)

Web Title: Woman dies after getting stuck in two-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.