वळूच्या धडकेत महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 14:41 IST2019-11-05T14:41:27+5:302019-11-05T14:41:33+5:30
मृत महिलेचे नाव फिरोजा बी सुबेदार खाँ (वय ५० वर्षे) असून त्या शहरातील महात्मा फुले नगरमधील रहिवासी आहे

वळूच्या धडकेत महिलेचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : येथील महात्मा फुले नगरमधील ५० वर्षीय महिला म्हशी चारण्याकरिता गेली असता म्हशीच्या कळपातील एका वळूने तीला जबर धडक दिली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार, ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास साखरा फाट्यानजिकच्या तलावाजवळ घडली.
मृत महिलेचे नाव फिरोजा बी सुबेदार खाँ (वय ५० वर्षे) असून त्या शहरातील महात्मा फुले नगरमधील रहिवासी आहेत. प्राप्त माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास काही म्हशी आणि वळूची टक्कर झाली. यावेळी संतूलन बिघडलेल्या वळूने जवळच उभ्या असलेल्या फिरोजा बी सुबेदार खाँ यांना जबर धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने रिसोडच्या महात्मा फुले नगरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळाला पोलीस उपनिरीक्षक संतोष नेमणार यांनी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास रिसोड पोलीस करित आहे.
(प्रतिनिधी)