विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू
By admin | Published: June 22, 2016 12:35 AM2016-06-22T00:35:40+5:302016-06-22T00:35:40+5:30
कारंजा लाड तालुक्यातील घटना.
कारंजा लाड(जि. वाशिम): शेतात मॉन्सूनपूर्व कपाशी पिकाला पाणी देण्यासाठी मोटरपंप सुरू करतेवेळी विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू झाला. सुनीता ज्ञानेश्वर कानकिरड (४0) असे मृतक महिलेचे नाव आहे. ही घटना सोमवार २0 जून रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास कारंजा तालुक्यातील बांबर्डा कानकिरड येथे घडली मृतक महिलेच्या पतीने कामरगाव पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले आहे, की सुनीता ज्ञानेश्वर कानकिरड या सोमवार २0 जून रोजी आपल्या बांबर्डा शेत शिवारातील शेतात गेल्या होत्या. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास शेतात पेरणी केलेल्या मॉन्सूनपूर्व कपाशीला पाणी देण्यासाठी मोटरपंप सुरू करीत असताना त्यांना विजेचा धक्का लागला. त्यांना तत्काळ कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच कामरगाव वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता दाभाडे, लाइनमन बुराळे व तलाठी ठाकूर यांनी घटनास्थळाला भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, पुढील तपास धनज पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल गुहे करीत आहे.