महिलांनी वैज्ञानिक दृष्टीकोन स्विकारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 08:13 PM2017-09-26T20:13:09+5:302017-09-26T21:59:29+5:30
महीला उच्चविदयाभुषीत चांगली शिकलेली असेल तर तीने आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करतांना अंधश्रध्देचा त्याग करून वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारला पाहीजे असे मत श्रीमती शंकुतलाबाई धाबेकर महाविदयालय कारंजा यांच्या वतीने राष्टीय सेवा योजना पथकाव्दारे आयोजीत अंधश्रध्दा निमूर्लन आणि वैज्ञानिक दृष्टीकोन या विषयावर बोलतांना अनिसच्या वाशिम जिल्हा प्रमुख डॉ.स्वप्ना लांडे यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा : विश्वाची जननी म्हणुन महीलेकडे पहीले जाते. महीला जर अज्ञानी किंवा अंधश्रध्दाळू असेल तर ती आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करतांना तिच्याकडून न कळत अंधश्रध्देचे संस्कार घडतात. ती अडाणी किंवा अशिक्षीत असेल तर हे होणारच परंतू एखादी महीला उच्चविदयाभुषीत चांगली शिकलेली असेल तर तीने आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करतांना अंधश्रध्देचा त्याग करून वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारला पाहीजे असे मत श्रीमती शंकुतलाबाई धाबेकर महाविदयालय कारंजा यांच्या वतीने राष्टीय सेवा योजना पथकाव्दारे आयोजीत अंधश्रध्दा निमूर्लन आणि वैज्ञानिक दृष्टीकोन या विषयावर बोलतांना अनिसच्या वाशिम जिल्हा प्रमुख डॉ.स्वप्ना लांडे यांनी व्यक्त केले.
आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता शिक्षण मंडळ, बार्शीटाकळीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर, प्रमुख अतिथी म्हणुन महाविदयालयाचे प्राचार्य डॉ सुभाष गवई, महाविदयाल विकास समितीचे भुजंगराव वाळके, विजय काळे, अॅड. विजय बगडे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला डॉ.कैलास गायकवाड, डॉ अशोक जाधव, डॉ.संतोष खंडारे, प्रा. पराग गांवडे, प्रा. राहुल रडके, डॉ.योगेश पोहकार, राजू अढाऊ, प्रविण डफडे, बाळकृष्ण खानबरड, प्रकाश लोंखडे, राजु राउत, सुनिल राजगुरे, अरून ईसळ यांनी परीश्रम घेतले.