महिला कलावंतांनी वाशिम शहरात राबविले स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 05:49 PM2018-06-26T17:49:03+5:302018-06-26T17:50:22+5:30
वाशिम: राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांच्या मार्गदर्शनात परिवर्तन कला महासंघाच्या महिला कलावंतांनी शहरातील स्थानिक रमाबाई नगर व दिघेवाडी न.प. शाळेसमोर स्वच्छता अभियान राबविले.
वाशिम: राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांच्या मार्गदर्शनात परिवर्तन कला महासंघाच्या महिला कलावंतांनी शहरातील स्थानिक रमाबाई नगर व दिघेवाडी न.प. शाळेसमोर स्वच्छता अभियान राबविले.
सामाजिक न्याय दिनानिमित्त रिपाइं व महासंघाच्या वतीने परिवर्तन कला महासंघाचे जिल्हाध्यक्ष शेषराव मेश्राम, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष विशाखा इंगळे यांच्या नेतृत्वात हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी शेषराव मेश्राम म्हणाले की, छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील रुढीपरंपरा, चालीरिती, जुन्या समाजरचना, सामाजीक अन्याय दुर करुन सर्व बहूजनांना न्याय दिला व कोणताही भेदभाव न करता सर्व समाजातील लोकांसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली. व लोककल्याणकारी राज्य निर्माण केले. म्हणून शाहू महाराजांना सामाजीक न्यायाचे जनक म्हणतात. त्यांच्या जन्मदिनी स्वच्छ भारत अयिान, स्वच्छ वाशीम सुंदर वाशीम, स्वच्छता अभियानाची जागृती व्हावी यासाठी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच परिवर्तन कला महासंघाच्यावतीने जिल्ह्यात स्वच्छता अभियान, बेटी बचाव बेटी पढाव, व्यसनमुक्तीची जनजागृती करण्यात येईल असे पकम वाशीम तालुका अध्यक्ष शाहीर लोडजी भगत व रिसोड पकम तालुका अध्यक्ष शाहीर दत्ता वानखडे यांनी सांगीतले. या स्वच्छता अभियानात महिला अध्यक्षा विशाखा इंगळे, लक्ष्मीबाई इंगळे, पार्वतीबाई पठाडे, अरुणा पठाडे, शारदाबाई इंगोले, इंदुबाई कांबळे, छाया पट्टेबहादुर, रुक्माबाई पद्मणी, सुनिता खंडारे, लक्ष्मीबाई पट्टेबहादुर, रेखाबाई कांबळे, मयुरा इंगळे, प्रियंका खंडारे, अंजली खडसे तसेच माजी सैनिक माणिक गुडदे, अरुण इंगळे, आकाश खंडारे यांच्यासह कलावंतांची उपस्थिती होती. शेषराव मेश्राम यांनी सवार्चे आभार मानले.