मीटर रिडींग, बील वाटपाचे काम मिळण्यासाठी महिलांचा ‘एल्गार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 03:31 PM2018-11-12T15:31:19+5:302018-11-12T15:32:23+5:30

वाशिम : मासिक मीटर रिडींग घेणे व बील वाटपाचे काम मिळण्याकरिता कौशल्य विकास सशक्तीकरण समुहाच्या १५ महिलांनी ‘एल्गार’ पुकारला असून सोमवार, ५ नोव्हेंबरपासून सदर महिला महावितरणच्या वाशिम येथील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत.

Women agitation for getting meter reading work | मीटर रिडींग, बील वाटपाचे काम मिळण्यासाठी महिलांचा ‘एल्गार’

मीटर रिडींग, बील वाटपाचे काम मिळण्यासाठी महिलांचा ‘एल्गार’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मासिक मीटर रिडींग घेणे व बील वाटपाचे काम मिळण्याकरिता कौशल्य विकास सशक्तीकरण समुहाच्या १५ महिलांनी ‘एल्गार’ पुकारला असून सोमवार, ५ नोव्हेंबरपासून सदर महिला महावितरणच्यावाशिम येथील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत. दरम्यान, प्रश्नावर प्रभावी तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार संबंधित महिलांनी बोलून दाखविला.
महिला कौशल्य विकास सशक्तीकरण समुहाने यापूर्वी एकवेळ घरगुती वीज वापर करणाºया ग्राहकांच्या विद्यूत मीटरचे रिडींग घेणे व बील वाटपाचे काम केले होते. असे असताना आता २०१८-१९ मध्ये वाशिम उपविभागात सिद्धीविनायक सुशिक्षित बेरोजगार संस्था, चंद्रपूर यांना निविदा देण्यात आली. तसेच शारदा महिला बचतगटाला एका पी.सी.चे काम देण्यात आले. यात हेतुपुरस्सर महिला कौशल्य विकास सशक्तीकरण समुहाला डावलण्यात आल्याचा आरोप करून याविरोधात संबंधित समुहाच्या महिलांनी ५ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण अंगिकारले आहे. 
आंदोलनात गुरू लक्ष्मण चंद्रशेखर यांच्यासह शारदा भोसले, वर्षा जाधव, लक्ष्मी भालेराव, वंदना राऊत, संध्या इंगळे, रेखा वानखडे, प्रमिला खुळे, अंजली गायकवाड, राजश्री गायकवाड, पंचशिला कंकाळ, मिनाक्षी गवई, रजिया सैय्यद, रुबीना चाँदखाँ पठाण, कल्पना कंकाळ, छाया राऊत आदींनी सहभाग नोंदविला आहे.

Web Title: Women agitation for getting meter reading work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.