महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी घेतली सात बालके दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:36 AM2021-01-22T04:36:30+5:302021-01-22T04:36:30+5:30
बालके दत्तक कार्यक्रमावेळी त्यांच्या समवेत विस्तार अधिकारी मदन नायक, तालुका समनव्यक शेख रहेबर, पर्यवेक्षिका मीनाक्षी सुळे, ...
बालके दत्तक कार्यक्रमावेळी त्यांच्या समवेत विस्तार अधिकारी मदन नायक, तालुका समनव्यक शेख रहेबर, पर्यवेक्षिका मीनाक्षी सुळे, अंगणवाडी सेविका सरला देशमुख काटा हे उपस्थित होत्या ,काटा येथील सात कुपोषित बालकांचा शारीरिक विकास व्हावा याकरिता बालकांना पोषक कड अन्नधान्यासह विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप यावेळी करण्यात आले.
यापूर्वी अनसिंग या गावातील सहा कुपोषित बालके दत्तक घेतली होती, त्यापैकी पाच बालके आजघडीला कुपोषण मुक्त झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर २० जानेवारी राेजी काटा गावातील अजून, सात कुपोषित बालके दत्तक घेतली आहेत. दत्तक घेण्यात आलेल्या बालकांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या निकोप शारीरिक वाढीकरिता आवश्यक त्या सगळ्या उपाययोजना आपण करणार असल्याचे प्रकल्प अधिकारी प्रियंका गवळी यांनी यावेळी सांगितले. शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या सेवे व्यतिरिक्त सामाजिक जाणिवेतून वैयक्तिकरीत्या कुपोषणाविरुद्ध चालविलेल्या या मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.