महिला व बालकल्याण विभागातर्फे स्त्री जन्माचे स्वागत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 07:35 PM2017-10-17T19:35:14+5:302017-10-17T19:40:13+5:30

स्त्री-पुरूष लिंगगुणोत्तरातील तफावत कमी करणे आणि मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ह्यबेटी बचाओ-बेटी पढाओह्ण अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यात ह्यकन्यारत्नह्ण जन्मताच जिल्हा प्रशासनातर्फे माता-पित्यांचे अभिनंदन आणि मिठाई देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

Women and child Welfare Department welcome birth! | महिला व बालकल्याण विभागातर्फे स्त्री जन्माचे स्वागत !

महिला व बालकल्याण विभागातर्फे स्त्री जन्माचे स्वागत !

googlenewsNext
ठळक मुद्दे 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' अभियान अभिनंदनपर कार्ड व मिठाई देण्याचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : स्त्री-पुरूष लिंगगुणोत्तरातील तफावत कमी करणे आणि मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यात 'कन्यारत्न' जन्मताच जिल्हा प्रशासनातर्फे माता-पित्यांचे अभिनंदन आणि मिठाई देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
'बेटी बचाओ-बेटी पढाओ' या अभियानांतर्गत जनजागृती म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालकल्याण विभागाने कन्यारत्न प्राप्त होताच माता-पित्यांचे अभिनंदन करण्याचा उपक्रम राबविला. यापुढेही 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' अभियानांतर्गत जनजागृतीपर विविध उपक्रम राबविण्याचा मनोदय जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला. स्त्री-पुरूष लिंग गुणोत्तरातील तफावत दूर करण्याबरोबरच मुलींना शिक्षणाचे धडे देण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे.

Web Title: Women and child Welfare Department welcome birth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.