वाटोद येथे महिलेस मारहाण; चौघांविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 03:56 PM2018-10-16T15:56:14+5:302018-10-16T15:56:50+5:30
मानोरा (वाशिम) : तालुक्यातील वाटोद येथे आधार कार्डसाठी जन्म तारखेचा दाखला मागण्याकरीता अंगणवाडी सेविकेच्या घरी गेलेल्या महिलेस १४ आॅक्टोबर रोजी चार जणांनी मारहाण केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम) : तालुक्यातील वाटोद येथे आधार कार्डसाठी जन्म तारखेचा दाखला मागण्याकरीता अंगणवाडी सेविकेच्या घरी गेलेल्या महिलेस १४ आॅक्टोबर रोजी चार जणांनी मारहाण केली. याप्रकरणी १६ आॅक्टोबरला दाखल फिर्याद व वैद्यकीय अहवालावरून मानोरा पोलिसांनी चार जणांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.
वाटोद येथील फिर्यादी महिला रमाबाई अर्जुन जामनिक ही लहान मुलांच्या आधारकार्डसाठी जन्म तारखेचा दाखला मागण्याकरीता अंगणवाडी सेविका मंदाबाई रामचंद्र कांबळे यांच्या घरी गेली होती. त्यांनी दाखला देण्यास नकार देत वाद घातला. यावेळी रामचंद्र गोमाजी कांबळे, राधाबाई अनिल जामनिक, सुधाबाई साहेबराव जामनिक यांनी हातावर जबर मारहाण केली. फिर्यादी महिलेला मानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी जखमी महिलेला यवतमाळ येथे ‘रेफर’ केल्याचे समजते. याप्रकरणी अंगणवाडी सेविकेसह चार जणांविरूद्ध भादंवी कलम ३२४, ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास मानोरा पोलिस करीत आहेत.