बँकेतील गर्दी नियंत्रणासाठी महिला कर्मचारी सरसावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 06:03 PM2021-05-19T18:03:10+5:302021-05-19T18:03:20+5:30
Washim News : महिला कर्मचाºयांनी पुढाकार घेत बुधवारी नागरिकांनी एका रांगेत ठेवून गर्दीवर नियंत्रण मिळविले.
मानोरा : बँकांमध्ये होणाºया गर्दीतून कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून धामणी मानोरा येथील ग्रामपंचायत सचिव व तलाठी असलेल्या महिला कर्मचाºयांनी पुढाकार घेत बुधवारी नागरिकांनी एका रांगेत ठेवून गर्दीवर नियंत्रण मिळविले.
सध्याच्या कोरोनाकाळातही बँकांमध्ये गर्दी होत आहे. यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याला प्राधान्य दिले जात आहे. बँक प्रशासनातर्फेदेखील गर्दी नियंत्रणासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, नागरीक जुमानत नसल्याने अनेकठिकाणी गर्दी कायम असल्याचे दिसून येते. या प्रकाराला मानोरा तालुक्यातील धामणी मानोरा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा अपवाद ठरत आहे. गर्दीतून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ग्रामपंचायत सचिव मंजूषा राठोड (आडे) व तलाठी वैशाली वानखडे यांनी पुढाकार घेतला. राठोड व वानखडे या महिला कर्मचारी सकाळी ९ वाजताच बँकेसमोर हजर झाल्या आणि गर्दीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पहिल्या दिवशी बँकेसमोर फारशी गर्दी दिसून आली नाही. यापुढेही नागरिकांनी शिस्त पाळून गर्दीतून कोरोना संसर्ग होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन मंजूषा राठोड व वैशाली वानखडे यांनी केले.