घरकुल मागणीसाठी महिलांची पं.स.वर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:45 AM2021-03-09T04:45:19+5:302021-03-09T04:45:19+5:30

अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा असून दारिद्रयरेषेखाली जीवन जगणाºया नागरिकांना तसेच अपंग, निराधार, विधवा, परितक्त्यांना केंद्र व राज्य ...

Women hit PNS for house demand | घरकुल मागणीसाठी महिलांची पं.स.वर धडक

घरकुल मागणीसाठी महिलांची पं.स.वर धडक

Next

अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा असून दारिद्रयरेषेखाली जीवन जगणाºया नागरिकांना तसेच अपंग, निराधार, विधवा, परितक्त्यांना केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजनांमधून घरकुल बांधकामासाठी निधी दिला जातो. दरम्यान, तालुक्यातील आसोला या गावी कुडा, मातीचे घर असलेल्या आणि पात्र माता-भगिनींना अद्याप घरकुल मिळालेले नाही. या मागणीची पुर्तता करण्यासाठी रणरणत्या उन्हात पंचायत समिती, मानोरा येथे महिलांनी धडक दिली. ज्यांना रहायला घरे नाहीत, त्यांना घरकुलांचा लाभ द्या, अशी मागणी यावेळी संबंधित महिलांनी नव्यानेच रुजू झालेल्या गटविकास अधिकारी वाघमारे यांच्यासमक्ष मांडली. याशिवाय महिला सभापती सागर जाधव यांची भेट घेऊन प्रश्न निकाली काढण्याची गळ त्यांच्याकडे घालण्यात आली.

...............

कोट :

आसोला येथील महिलांनी घरकुलांचे प्रस्ताव स्थानिक ग्रामपंचायतीकडे सादर करावे. त्यानंतर तातडीने पुढील आवश्यक ती कारवाई पंचायत समिती स्तरावरून करण्यात येईल. हा प्रश्न शक्य तितक्या लवकर मार्गी लावण्याचे प्रयत्न राहतील.

सागर प्रकाश जाधव

सभापती, पं.स., मानोरा

Web Title: Women hit PNS for house demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.