कारंजात जमली महिला कबड्डीपटूंची मांदियाळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 06:10 PM2018-10-02T18:10:53+5:302018-10-02T18:13:20+5:30
कारंजा लाड : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने कारंजा येथील श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयात मंगळवार, २ आॅक्टोबर ते गुरूवार, ४ आॅक्टोबरदरम्यान विद्यापीठस्तरीय महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने कारंजा येथील श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयात मंगळवार, २ आॅक्टोबर ते गुरूवार, ४ आॅक्टोबरदरम्यान विद्यापीठस्तरीय महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा उद्घाटन सोहळा आज थाटात पार पडला. या स्पर्धेत पाच जिल्ह्यातील तथा ५९ महाविद्यालयांमधील ७०८ महिला खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे.
उद्घाटन कार्यक्रमास जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बाबासाहेब धाबेकर, जिल्हा क्रिडा अधिकारी प्रदिप शेटीये. प्राचार्य डॉ. सुभाष गवई, भुजंगराव वाळके, विजय काळे, सुरेश दवंडे व महाविद्य़ालयीन प्राध्यापकांची उपस्थिती होती. पहिल्या दिवशी नानासाहेब देशमुख महाविद्यालय, पातूर व श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय, कारंजा यांच्यात पार पडला.
या स्पर्धेत अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ आणि वाशिम अशा पाच जिल्ह्यातील महिला खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असून ५९ संघांमध्ये विजयश्री पटकाविण्यासाठी आगामी तीन दिवस कबड्डीची लढत होणार आहे.