बचत गटातील महिलांनी पुकारले उपोषण; मीटर रिडिंगची कामे काढून घेतल्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 06:27 PM2018-01-02T18:27:12+5:302018-01-02T18:28:39+5:30
वाशिम: शहरातील भाग क्रमांक एकमधील नागरिकांच्या विद्यूत मीटरचे चुकीचे रिडिंग घेतल्याचा ठपका ठेवून महावितरणने महिला कौशल्य विकास सशक्तीकरण समुह या बचतगटातील महिलांनी १ जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले असून २ जानेवारीलाही ते सुरूच असल्याचे दिसून आले.

यासंदर्भात कार्यकारी अभियंत्यांकडे सादर केलेल्या निवेदनात बचत गटातील महिलांनी नमूद केले आहे, की आमच्याकडे काम असलेल्या भागात ९५ टक्के ग्राहक महावितरणच्या काऊंटरवर; तर केवळ ५ टक्के ग्राहक मोबाईल अॅपव्दारे बिलाचा भरणा करतात. त्यामुळे चुकीचे रिडिंग घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. याऊलट अचूक रिडिंग घेतल्यामुळे ग्राहकांच्या देयक रकमेत वाढ झाल्याने महावितरणच्या महसूलात वृद्धी झाली; परंतु ग्राहकांचा रोष ओढवला गेला. त्यासाठी एजन्सीला दोषी धरणे चुकीचे आहे. एकूणच या सर्व बाबींचा विचार करून बचत गटाच्या एजन्सीला काम सुरू करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी उपोषणकर्त्या महिलांनी केली.