महिलांना मधुमक्षिका पेट्यांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:19 AM2021-03-04T05:19:15+5:302021-03-04T05:19:15+5:30

............... बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित जऊळका रेल्वे : जिल्ह्यात यावर्षी २६ बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्यासाठी लागणारा निधीदेखिल प्राप्त ...

Women wait for bee boxes | महिलांना मधुमक्षिका पेट्यांची प्रतीक्षा

महिलांना मधुमक्षिका पेट्यांची प्रतीक्षा

googlenewsNext

...............

बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित

जऊळका रेल्वे : जिल्ह्यात यावर्षी २६ बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्यासाठी लागणारा निधीदेखिल प्राप्त झाला असून काही ठिकाणचे बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित होऊन त्याचा वापर सुरू झाल्याची माहिती कृषी विकास अधिकारी विकास बंडगर यांनी दिली.

..............

वाशिमात अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था

वाशिम : शहरातील अंतर्गत रस्त्यांचे काही महिन्यांपूर्वी नुतनीकरण झाले; मात्र अल्पावधीतच रस्ते खराब झाले आहे. काही रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

.............

कुपनलिकांच्या पाणीपातळीत घट

किन्हीराजा : गतवर्षी चांगले पर्जन्यमान झाल्याने यावर्षी पिकांच्या सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाले. आता मात्र कुपनलिकांची पाणीपातळी हळूहळू घटत चालली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन ग्रा.पं.कडून करण्यात आले आहे.

...........

देयक वसुलीची मोहीम जोरात

मेडशी : परिसरात अनेक ग्राहकांकडे विद्युत देयकांची हजारो रुपयांची रक्कम थकीत आहे. ती वसूल करण्याची मोहीम महावितरणकडून हाती घेण्यात आली आहे. जे ग्राहक देयक भरत नाहीत, त्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे.

................

लघुव्यावसायिक आर्थिक संकटात

वाशिम : रस्त्याच्या कडेला बसून लहानसहान व्यवसाय करणाऱ्या लघुव्यावसायिकांना प्रशासनाच्या आदेशामुळे सायंकाळी पाच पूर्वीच दुकाने बंद करावी लागत आहेत. यामुळे व्यवसाय कमी होत असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.

................

वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण

वाशिम : तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण झाले असून काही लोकांनी जमीन वहितीखाली आणली आहे. त्याचा शोध घेऊन अतिक्रमण हटवावे, अशी मागणी वृक्षप्रेमी माधवराव मारशेटवार यांनी बुधवारी केली.

.............

आरोग्य तपासणी मोहिमेस प्रतिसाद

वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात बुधवार, ३ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी मोहिमेस रुग्णांकडून चांगला प्रतिसाद मिळाला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली.

.............

महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

वाशिम : शहरातील पोस्ट ऑफिस चौक, हिंगोली नाका, पुसद नाका याठिकाणाहून गेलेल्या महामार्गावरील वाहतूक बुधवारी दुपारच्या सुमारास विस्कळीत झाली होती. वाहनांची लांबच लांब रांग लागल्याचे यावेळी पाहावयास मिळाले.

.............

छोट्या मालवाहू वाहनांतून जडवाहतूक

वाशिम : छोट्या स्वरूपातील मालवाहू वाहनांच्या टपावर गज, स्प्रिंकलर पाईप, अँगल अशा जड वस्तूंची वाहतूक केली जात आहे. याकडे पोलीस विभागाने लक्ष पुरवून हा प्रकार तात्काळ बंद करावा, अशी मागणी ज्ञानेश्वर जाधव यांनी मंगळवारी शहर वाहतूक विभागाकडे केली.

................

जिल्हा रुग्णालयात वराहांचा मुक्त संचार

वाशिम : जिल्हा रुग्णालय परिसरात नेहमीच अस्वच्छता पसरलेली असते. यासह मोकाट श्वान आणि वराहांचा मुक्त संचार असतो. याकडे रुग्णालय प्रशासनाने लक्ष पुरवून स्वच्छता ठेवण्याची मागणी बाळू आगाशे यांनी बुधवारी निवेदनाव्दारे केली.

................

सौरऊर्जा वापराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

वाशिम : अपारंपरिक ऊर्जास्त्रोत म्हणून सौरऊर्जा वापरावर भर देण्याचे शासनाचे आदेश आहेत; मात्र प्रशासकीय कार्यालयांमध्येच त्याचे पालन होत नाही. काही कार्यालयांचा अपवाद वगळल्यास बहुतांश कार्यालयांनी याकडे दुर्लक्ष केलेले आहे.

...............

खासगी बसेसमध्ये नियमांचे उल्लंघन

वाशिम : शहरातून ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणाºया खासगी बसेसमध्ये (लक्झरी) कोरोनाविषयक अनेक नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष पुरवून कारवाई करण्याची मागणी मंगेश गोटे यांनी बुधवारी केली.

..................

आंब्याच्या झाडांवर माकडांचा उच्छाद

वाशिम : अनुकूल वातावरणामुळे शहर परिसरातील बहुतांश आंब्याची झाडे यंदा कैऱ्यांनी लदबदली आहेत. त्यावर मात्र दिवसभरातून अनेकवेळा माकडे उच्छाद मांडत असून कैऱ्या परिपक्व होण्यापूर्वीच गळून पडत असल्याचे दिसून येत आहे.

...............

कठोर नियमामुळे थुंकण्यावर नियंत्रण

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाला आळा बसावा, यासाठी दुकाने, पानटपºया सायंकाळी ५ वाजेनंतर बंद ठेवण्याचे प्रशासनाचे निर्देश आहेत. यामुळे खर्रा, पुड्यांची विक्री घटली असून सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावरही नियंत्रण मिळाल्याचे दिसून येत आहे.

.............

रस्ता दुभाजक उभारण्याची मागणी

वाशिम : शहरातून रिसोडकडे जाणाºया लाखाळापर्यंतच्या रस्त्यावर चांगल्या दर्जाचे दुभाजक उभारण्यात यावे. यामुळे वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल, अशी मागणी युवा सामाजिक कार्यकर्ते संदीप चिखलकर यांनी बुधवारी बांधकाम विभागाकडे केली.

................

दर्जाहीन गव्हामुळे लाभार्थींमध्ये नाराजी

वाशिम : स्वस्त धान्य दुकानांमधून २ रुपये किलो याप्रमाणे मिळणारा गहू दर्जाहीन असून किड्यांनी टोकरलेला आहे. यामुळे संबंधित लाभार्थींमधून नाराजीचा सूर उमटत आहे. दर्जा राखण्याची मागणी मनीष बत्तुलवार यांनी पुरवठा विभागाकडे बुधवारी निवेदनाव्दारे केली.

............

मंदिरातील घंटीलाही लावले ‘सेन्सर’

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही धोका होऊ नये, या उद्देशाने आययूडीपीमधील संत गजानन महाराज संस्थानने मंदिरातील घंटीलाही ‘सेन्सर’ लावले आहे. हात न लावताच घंटी वाजण्याची सोय त्यात करण्यात आली आहे.

Web Title: Women wait for bee boxes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.