रिसोड येथे महिला किसान दिवस उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 01:12 PM2017-10-18T13:12:48+5:302017-10-18T13:13:03+5:30
रिसोड: कृषी विज्ञान केंद्र करडा व महिला विकास आर्थिक महामंडळ वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने १५ आॅक्टोबर रोजी स्थानिक भारत माध्यमिक शाळेच्या सभागृहात महिला किसान दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण महिलांमध्ये शेतीसंबंधी आवड निर्माण व्हावी व शेतीचे अद्ययावत तंत्रज्ञान अवगत व्हावे या हेतुने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाशिम जि.प. अध्यक्षा हर्षदा देशमुख, तर उद्घाटक म्हणून भारत माध्यमिक शाळा व ज्युनिअर कॉलेज रिसोडचे प्राचार्य प्रदीप डोमळे, तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. एल. काळे, तसेच तंत्रज्ञ आर. एस. डवरे, एस. के. देशमुख, टी. एस. देशमुख, डी. एन. इंगोले, डॉ. डी. एल. रामटेकेया, रिसोड येथील लोकसंचालित कें द्राचे व्यवस्थापक शरद कांबळे, प्रदीप तायडे रेखा सरकटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या प्रसंगी जि.प. अध्यक्षा हर्षदा देशमुख यांनी शेतकरी महिलांचे शेतीमधील योगदान ६० टक्के असल्याचे नमूद करीत निर्णय क्षमतेमध्ये महिलांचा सहभाग कमी असल्यामुहे अद्ययावत तंत्रज्ञालाचा अंगीकार करून निर्णय क्षमता वाढविण्याचे आवाहन केले.