पाण्यासाठी महिलांची पायपीट

By admin | Published: April 30, 2017 11:37 PM2017-04-30T23:37:33+5:302017-04-30T23:37:33+5:30

जानेवारीपासून ग्रामपंचायतची पाणी पुरवठा योजना बंद असतानाच पाणी पुरवठ्याची विहिर आटत चालल्याने पाण्यासाठी मालेगाव

Women's footpath for water | पाण्यासाठी महिलांची पायपीट

पाण्यासाठी महिलांची पायपीट

Next
>ऑनलाइन लोकमत
शिरपूर जैन (वाशिम ), दि. 30  - जानेवारीपासून ग्रामपंचायतची पाणी पुरवठा योजना बंद असतानाच पाणी पुरवठ्याची विहिर आटत चालल्याने पाण्यासाठी मालेगाव तालुक्यातील किन्ही घोडमोड येथे ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. महिला मंडळी जीव धोक्यात घालून ग्रामपंचायतच्या विहिरीवर पाणी भरताना दिसत आहेत.
 
मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर-किन्ही घोडमोड गटग्रामपंचायतमधील किन्ही घोडमोड हे चौदाशे लोकसंख्येचे गाव आहे.  या गावात ग्रामपंचायतच्यावतीने विहिरीवरून गावकºयांना पाणी पुरवठा करण्यात येतो; परंतु जानेवारीपासून ही योजना बंद आहे. त्यातच या योजनेची विहिरही आटत चालली आहे. त्यामुळे गावकरी, महिलांना गावाबाहेरू न पाणी आणावे लागते. महिला किलोमीटर अंतरावरून डोक्यावर घागरीने पाणी आणतात, तर काही ग्रामस्थ बैलगाडीत टँकर बसवून पाणी भरताना दिसतात. रखरखत्या उन्हात पाण्यासाठी होत असलेली महिलांची केविलवाणी परिस्थिती पाहणेही कठीण आहे.

Web Title: Women's footpath for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.