ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिलांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:31 AM2021-07-17T04:31:08+5:302021-07-17T04:31:08+5:30
वाशिम तालुक्यातील उकळीपेन, सुकळी, राजगाव, सायखेडा, पंचाळा, कृष्णा, सोनगव्हाण, धुमका आदी गावांमध्ये १५ जुलै रोजी ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत पोषण ...
वाशिम तालुक्यातील उकळीपेन, सुकळी, राजगाव, सायखेडा, पंचाळा, कृष्णा, सोनगव्हाण, धुमका आदी गावांमध्ये १५ जुलै रोजी ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत पोषण परसबाग प्रात्यक्षिक व जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात पोषण परसबाग तयार करण्यासाठी पं.स. तालुका कक्षाचे बबन मेरकर, मनवर, सुधीर कायपलवाड यांचे सहकार्य लाभले. तसेच सर्व कॅडर, सीटीसी कृतीसंगम चंद्रकला वाघमारे, पशुसखी मंगला कांबळे, बँकसखी गोदावरी अंभोरे, कृषीसखी सरला अंभोरे या महिलांनी आपापल्या शेतात किंवा अंगणात पोषण परसबाग तयार करून त्याव्दारे उत्कृष्ट भाजीपाल्याचे उत्पादन घेतले.
-----------
भाजीपाला उत्पादनाबाबत मार्गदर्शन
रोजच्या खाण्यामध्ये उपयोगात येणाऱ्या भाजीपाल्यातून योग्य ते पोषण मूल्य मिळविण्यासाठी परसबागेतून उत्कृष्ट व जीवनसत्त्वयुक्त भाजीपाला कसा पिकवावा, याचे प्रात्यक्षिक या उपक्रमातून महिलांना देण्यात आले तसेच सदोष भाजीपाल्याचे उत्पादन थांबविण्यासाठी उमेद महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सीटीसीपदावर महिलांची निवड करण्यात आली आहे.