अवैध दारूविक्रीविरोधात शिरपुटीच्या महिलांची पोलिस स्टेशनवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 01:21 PM2019-02-19T13:21:40+5:302019-02-19T13:22:23+5:30
अनसिंग (वाशिम) : वाशिम तालुक्यातील शिरपुटी येथे खुलेआम गावठी दारूचे गाळप करून विक्री करण्यात येत आहे. यामुळे गावातील शांतता भंग होत असतानाही पोलीस प्रशासन दखन घेत नसल्याने गावातील महिलांनी सोमवार १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी थेट अनसिंग पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अनसिंग (वाशिम) : वाशिम तालुक्यातील शिरपुटी येथे खुलेआम गावठी दारूचे गाळप करून विक्री करण्यात येत आहे. यामुळे गावातील शांतता भंग होत असतानाही पोलीस प्रशासन दखन घेत नसल्याने गावातील महिलांनी सोमवार १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी थेट अनसिंग पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. यावेळी ठाणेदारांना निवेदन देऊन गावठी दारूविक्री बंद करण्याची मागणी करण्यात आली असून, दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
अनसिंग पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया शिरपुटी येथे मोठ्या प्रमाणात अवैध गावठी दारू काढण्यात येत असून, या दारूत घातक रसायनांचा वापरही करण्यात येत आहे. या दारुविक्रीमुळे गावात व्यसनाधीनता वाढून गावाची शांतता भंग झाली आहे. गावातील घराघरांत यामुळे वाद होत असून, या प्रकाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने गावातील महिलांनी सुदलाबाई रामचंद्र राठोड यांच्या नेतृत्वात एकत्र येऊन अनसिंग पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला. यावेळी महिलांनी अनसिंग पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना निवेदन सादर करून गावातील अवैध गावठी दारूचे गाळप आणि दारूविक्री त्वरित बंद करावी, अशी मागणी करण्यात आली. या मागणीची दखल घेऊन कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही महिलांनी दिला आहे.