गुंडी येथील महिला धडकल्या पंचायत मानोरा समितीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 04:32 PM2018-12-10T16:32:33+5:302018-12-10T16:33:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मानोरा : तालुक्यातील गुंडी येथे बंद असलेले हातपंपासह विविध मागण्यांसाठी पंचायत समिती कार्यालयावर १० डिसेंबर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : तालुक्यातील गुंडी येथे बंद असलेले हातपंपासह विविध मागण्यांसाठी पंचायत समिती कार्यालयावर १० डिसेंबर रोजी धडकल्यात.
गुंडी येथे हातपंप नादुरुस्त असल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. नाल्याही नादुरुस्त असल्याने रस्त्यावर पाणी साचून ग्रामस्थांचे आरोग्य धोकयात आले असल्याने हे प्रश्न त्वरित मार्गी लावण्याच्या मागणीसाठी महिला हातात गुंड, भरणे घेवून तहसील कार्यालयावर धडकल्यात व गटविकास अधिकारी यांच्यासमोर विविध समस्येचे ग्राºहाणे मांडून निवेदन सादर केले.
गटग्रामपंचायत एकलारा येथील गुंडी गावातील महिला आपल्या विविध समस्यांचे ग्राहाणे मांडण्यासाठी हातात गुंड व भरणे घेवुन पंचायत समिती कार्यालयात धडकल्या तेव्हा गटविकास अधिकारी सुरज गोहाड यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात. यासंदर्भात २८ नोव्हेंबर रोजी सुध्दा निवेदन दिले असल्याचे महिलांनी सांगितले, परंतु समस्या न सुटल्यामुळे पुन्हा गावातील महिलांना पंचायत समिती कार्यालयावर धडकण्याची वेळ आल्याचे महिलांनी यावेळी सांगितले. धडकल्या. निवेदनावर प्रशांत पडघान, भास्कर आडुळे, गौतम डाफसे, विलास भगत, हिरामण भगत, सुगत खाडे, देवराव पाडेन, नंदु कांबळे, महेंद्र भगत, किसन खिराडे, सुनिल पडघान, भाऊराव भगत, किसन खिराडे आदिंच्या स्वाक्षºया आहेत.