शेलू येथे पूरग्रस्तांसाठी महिलांची मदतफेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:40 AM2021-07-29T04:40:57+5:302021-07-29T04:40:57+5:30
सद्य:स्थितीत महाराष्ट्रात महापुराने थैमान घातले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितसोबतच वित्तहानीही झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन या पूरग्रस्तांना ...
सद्य:स्थितीत महाराष्ट्रात महापुराने थैमान घातले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितसोबतच वित्तहानीही झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन या पूरग्रस्तांना प्रत्येकाने मदत करणे अपेक्षित आहे, जेणेकरून पूरग्रस्तांना दिलासा मिळेल. यासाठी शेलूबाजार येथील अनेक नागरिकांनी आर्थिक मदत करून माणुसकी जिवंत असल्याचा परिचय दिला. या मदतफेरीमध्ये ११ हजार रुपये गोळा झाले असून, हा निधी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यात आला. मदतफेरीत सरपंच प्रमिला पवार, समाजिक कार्यकर्त्या तेजस्विनी काळे, जयमाला हरणे, दीपा शुक्ला, अनिता डावरे, सविता नाकाडे, योगीता डोके, अनिता रायके, लीलाताई मोहिते, योगेश्वर राऊत, निशांत चक्रनारायण, अंकुश तोडरवाल, अनिल धोटे, रोशन गावंडे, कीर्ती राऊत, बेबीताई क्षीरसागर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
270721\54372042-img-20210727-wa0026.jpg
मदत निधी जमा करतांना महिला