भूमिपूजन फलकावरून महिला लोकप्रतिनिधी गायब

By admin | Published: December 8, 2015 02:26 AM2015-12-08T02:26:22+5:302015-12-08T02:26:22+5:30

महिला लोकप्रतिनिधींची सा.बां. विरोधात तक्रार.

Women's Representatives to be missing from Bhumi Pujan | भूमिपूजन फलकावरून महिला लोकप्रतिनिधी गायब

भूमिपूजन फलकावरून महिला लोकप्रतिनिधी गायब

Next

मालेगाव: प्रत्येक क्षेत्रात महिलांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा देण्यासाठी न्यायालय व सरकारचा प्रयत्न सुरू असताना, स्थानिक पातळीवर काही विभागांकडून मात्र महिला लोकप्रतिनिधींनाच डावलले जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने एका भूमिपूजन फलकावर पुरुष लोकप्र ितनिधींची नावे आवर्जून टाकली; मात्र दुसर्‍या ठिकाणच्या फलकावर महिला लोकप्रतिनिधींची नावे वगळली. यामुळे संतप्त झालेल्या महिला लोकप्रतिनिधींनी सोमवारी वरिष्ठांकडे तक्रार केली.
मालेगाव तालुक्यातील शिरपूर व तिवळी येथे शासनाच्या निधीतून काही दिवसांपूर्वी प्रत्येकी एक असे दोन भूमि पूजन झाले. तिवळी येथे २९ तारखेला मालेगाव, शिरपूर, रिसोड राज्य मार्ग क्रमांक २८८ ची सुधारणा करण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला. या कामाचा फलकावर पुरुष लोकप्रतिनिधींची व संबंधित अधिकार्‍यांची नावे आवर्जून टाकण्यात आली. शिरपूर येथेही याच दरम्यान पर्यटन पायाभूत सुविधामधून विविध कामांचे भूमिपूजन झाले. ही सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे केली जात आहेत. शिरपूर येथे विशेषत: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधी महिला आहेत; मात्र येथे महिला लोकप्रतिनिधींची नावे फलकावर टाकली नाहीत. या प्रकारामुळे सुरुवातीला महिला लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त संबंधिं तांविरुद्ध कारवाईची मागणी तोंडी स्वरूपात केली होती; मात्र यावर काहीच होत नसल्याचे पाहून महिला लोक प्रतिनिधी संतप्त झाल्या. त्यांनी सोमवारी या प्रकाराची लेखी तक्रार दिली. जि.प. सदस्य शबिना बी इमदाद, पं.स. सदस्या कल्पना विजय अंभोरे, पं.स. सदस्य शिल्पा पंकज देशमुख यांची नावे न टाकल्याने सा.बां. चे 'राजकारण' समोर आले.

Web Title: Women's Representatives to be missing from Bhumi Pujan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.