‘लोकमत रक्ताचं नातं’ मोहिमेत महिलांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:28 AM2021-07-15T04:28:27+5:302021-07-15T04:28:27+5:30

‘लाेकमत रक्ताचं नातं’ या माेहिमेत नारीशक्ती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा संगीता इंगाेले यांनी पुढाकार घेऊन शहरात असलेल्या महिला संघटनांना एकत्रित ...

Women's response to the campaign 'Lokmat Raktacha Naat' | ‘लोकमत रक्ताचं नातं’ मोहिमेत महिलांचा प्रतिसाद

‘लोकमत रक्ताचं नातं’ मोहिमेत महिलांचा प्रतिसाद

Next

‘लाेकमत रक्ताचं नातं’ या माेहिमेत नारीशक्ती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा संगीता इंगाेले यांनी पुढाकार घेऊन शहरात असलेल्या महिला संघटनांना एकत्रित केले. शहरातील सहयोग फाउंडेशन, नारीशक्ती फाउंडेशन, बेटी बचाओ, बेटी पढाओ, लायनेस क्लब, इनरव्हील क्लब, महिला पतंजली, वाशिम, सौदामिनी बचत गट, नारीशक्ती बचत गट, कुलस्वामिनी बचत गट, नैसर्गिक पर्यावरण ग्रुप, नवनिर्माण महिला संस्थेने पुढाकार घेतला. यावेळी ७ महिलांसह एक पुरुष व एक युवक अशा ९ जणांचे रक्तदान करण्यात आले. यावेळी नारीशक्ती फाउंडेशन, बेटी बचाओ बेटी पढाओ संघटनेतर्फे रक्तदात्यांना एक पाव मनुक्याचे पाकीट तर हेमा साेमाणी यांनी रक्त वाढविण्यासाठी टाॅनिक बाॅटल, वृषाली टेकाडे यांनी चाॅकलेटचे वाटप केले. यावेळी नारीशक्ती फाउंडेशनच्या संगीता इंगाेले यांनी महिलांनी रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

............

माय-लेकी व पती-पत्नीचे साेबत रक्तदान

लाेकमत कार्यालयात आयाेजित रक्तदान शिबिरामध्ये रेखा रावले व देवयानी रावले या मायलेकीने तर वाशिम नगरपरिषदेचे सेवानिवृत्त मुख्याधिकारी वसंत इंगाेले व त्यांच्या पत्नी संगीता इंगाेले यांनी या शिबिरात रक्तदान केले. विशेष म्हणजे वसंत इंगाेले यांनी प्रथम रक्तदान केले.

............

शिबिराचे वेळापत्रक

१५ जुलै - जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय, वाशिम

१५ जुलै : तिरुपती सीटी, अकाेला राेड, वाशिम

१५ जुलै : जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम

१६ जुलै : कवठा ता. रिसाेड

Web Title: Women's response to the campaign 'Lokmat Raktacha Naat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.