सेवाभावी कार्यासाठी महिलांचा ‘तिसरा उंबरठा’ सक्रिय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:38 AM2021-03-08T04:38:58+5:302021-03-08T04:38:58+5:30
आजची स्त्री सर्वच क्षेत्रात पुरुषी वर्चस्वाला आव्हान देत स्वत:चे अस्तित्व सिद्ध करित आहे; मात्र केवळ स्वत: आणि कुटुंबासाठीच न ...
आजची स्त्री सर्वच क्षेत्रात पुरुषी वर्चस्वाला आव्हान देत स्वत:चे अस्तित्व सिद्ध करित आहे; मात्र केवळ स्वत: आणि कुटुंबासाठीच न जगता समाजातील गोरगरिब, गरजू महिलांच्या अडीअडचणी सोडविण्याकरिता सर्व बाबतीत सक्षम असलेल्या महिलांनी पुढाकार घ्यावा, या उदात्त हेतूने चार वर्षांपूर्वी डॉ. सरोज बाहेती यांनी ‘तिसरा उंबरठा’ या सामाजिक संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. चित्रा हरिभाऊ क्षीरसागर, प्रा. शुभांगी दामले, प्रा. मेघा देशमुख, सुवर्णा लाहोटी, संगीता देशमुख, विना कदम, भावना सुतवणे, माया गट्टाणी, अलका इंगळे, रेखा दुधे, भाग्यश्री नांदगावकर, अर्चना वाघ, कमल इंगोले यांच्यासह इतर महिलांनी त्यांना समर्थ साथ देत गोरगरीब, गरजू महिलांना मदतीसाठी हात पुढे केला आहे. महिलांनी महिलांसाठीच सुरू केलेल्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
..................
बॉक्स :
बी. सी.तून गोळा होतात पैसे
‘तिसरा उंबरठा’शी जुळलेल्या महिला महिन्यातून एकवेळ एकत्र जमत बी. सी. काढतात. त्यातून ठराविक रक्कम वेगळी ठेवून ती सामाजिक कार्यासाठी वापरली जाते. यामाध्यमातून चार वर्षांत दोन लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा होऊन ती विधायक कार्यांवर खर्च करण्यात आली आहे.
..................
कारागृहातील बंदीवानांसोबत रक्षाबंधन
‘तिसरा उंबरठा’तील महिलांनी गतवर्षी जिल्हा कारागृहात जाऊन बंदीवानांसोबत रक्षाबंधन साजरा केला. त्यांना ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रशिक्षण देऊन भविष्यात चांगल्या मार्गावर वाटचाल करण्याची शपथ घेण्यात आली, अशी माहिती ‘तिसरा उंबरठा’च्या भावना मनोज सुतवणे यांनी दिली.