कारागृहातील कैद्यांना महिलांनी बांधल्या राख्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 03:54 PM2019-08-17T15:54:16+5:302019-08-17T15:54:24+5:30
मी वाशिमकर गृपच्यावतिने कैद्यांना १५ आॅगस्ट रोजी कारागृहात जावून राख्या बांधण्यात आल्यात.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : समाजात सर्वच गुन्हेगार नसतात, काहींना परिस्थितीही जेलात पाठविते अशांना राखी पोर्णिमेच्या दिवशी बहिणीची आठवण झाल्यानंतर त्यांनाही कोणी राखी बांधण्यास यावे अशी अपेक्षा असतेच. याच उद्देशाने वाशिमच्या वाशिमकर गृपच्यावतिने कैद्यांना १५ आॅगस्ट रोजी कारागृहात जावून राख्या बांधण्यात आल्यात. यावेळी अनेक कैद्यांचे डोळे पानवले होते. काहींनी 'ताई आमच्याकडे तुला दयायला काही नाही' असे म्हणून साश्रुनयनांनी आभार व्यक्त केलेत.
मी वाशिमकर गृपमधिल महिला सदस्यांनी कैदयांना राख्या बांधण्यासंदर्भात कारागृह अधिक्षक यांच्याकडे विचार मांडला. त्यांनी सुध्दा सामाजिक उपक्रमाला प्राधान्य देत कैदयांना राख्या बांधण्याची परवानगी दिली. कैदयांना राख्या बांधल्या असता कैदयांना आपल्या बहिणीची आठवण आल्याचे त्यांच्या चेहºयावरुन दिसून येत होते. यावेळी कारागृहातील अधिक्षकांसह कर्मचाºयांची उपस्थिती लाभली होती.
बहिण-भावाच्या अतुट नात्याची विण घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या आनंददायी सणाचा कैद्यांनाही आनंद लुटता यावा. या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मी वाशिमकर गृपच्या सदस्या कैदयांना राखी बांधण्यासाठी गेले असता अनेक कैदयांना अश्रू आवरता आल्या नसल्याचे दिसून आले. यावेळी सर्व कैद्यांना राखीची भेट म्हणुन आपण केलेल्या चुका पुन्हा करू नका हीच आमच्यासाठी अमुल्य भेट राहील असे महिलांनी त्यांनी सांगितले. यावेळी कारागृह अधिक्षक सोमनाथ पाडुळे यांचेसह कारागृहातील कर्मचाºयांनासुध्दा राखी बांधण्यात आली.
मी वाशिमकर गृपच्यावतिने कारागृहात राबविण्यात आलेला रक्षाबंधनाचा कार्यक्रम स्तुत्य असून समाजाला आज अशा कार्यक्रमांची गरज आहे. कारागृहातील कैदयांना येथे येवून कैदयांना राख्या बांधल्याने त्यांच्यामध्ये एक चांगली भावना निर्माण झाली. कारागृहामध्ये आम्ही असे उपक्रम नेहमी घेतो. हा कार्यक्रम खरोखर कौतूकास्पद असल्याचे जिल्हा कारागृह अधिक्षक पाडुळे यांनी म्हटले.
रक्षाबंधनाचा कार्यक्रमाला सोनाली ठाकुर, करुणाताई कल्ले, उषा वानखड यांच्यासह मोठया प्रमाणात महिला उपस्थित होत्या.