ग्राम समितीच्या पुढाकाराने महिला शौचालय सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 01:34 PM2017-10-01T13:34:29+5:302017-10-01T13:34:29+5:30

Women's toilet started on the initiative of village committee | ग्राम समितीच्या पुढाकाराने महिला शौचालय सुरु

ग्राम समितीच्या पुढाकाराने महिला शौचालय सुरु

Next


किनगावजट्टू : लोणार पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या किनगावजट्टू
येथील बंद पडलेले महिला शौचालय ग्रामस्वच्छता सामितीच्या पुढाकाराने
पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
किनगावजट्टू येथील आरोग्य उपकेंद्रासमोर तीन वर्षापूर्वीपासून
शासनाचेवतीने महिलांकरीता सहा शौचालयाचे बांधकाम करण्यात आले होते. परंतु
संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे पाणी व लाईटअभावी हे शौचालय बंदच होते.
दरम्यान जि.प.शाळेसमोर व आरोग्य उपकेंद्रासमोर या महत्वाचे रस्त्यावर
महिला उघड्यावर शौचास बसत असल्याने, या रस्त्याने दुर्गंधी पसरत होती.
त्यामुळे येथील चार वर्षापासून कार्यरत असलेले स्वच्छता समितीचे अध्यक्ष
राजेश नागरे व त्यांचे सहकारी राजु सोरमारे, भगवान मुळे, गजानन गायकवाड,
मय्या तरवडे आदींनी पुढाकार घेऊन संपूर्ण शौचालयाची साफसफाई करुन
तात्पुरती पाण्याची व लाईटची व्यवस्था केली आणि शौचालयाच्या भिंतीला फलक
लावून हे शौचालय पुन्हा सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील
थोड्याफार प्रमाणात दुर्गंधी कमी होण्यास मदत झाली आहे. परंतु स्थानिक
ग्रामपंचायतने कायमस्वरुपी पाणी व्यवस्था व लाईटची व्यवस्था करुन देण्यात
यावी, अशी मागणी सुद्धा ग्रामस्वच्छता समितीने ग्रामपंचायतला केली आहे.

Web Title: Women's toilet started on the initiative of village committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.