जिल्ह्यात १६ सिंचन प्रकल्पांची कामे प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:01 AM2021-02-23T05:01:27+5:302021-02-23T05:01:27+5:30
जिल्ह्यात तुलनेने सिंचनाची प्रभावी सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकरी बारमाही पिके घेऊ शकत नाहीत. बांधकामाधीन १६ सिंचन लघुपाटबंधारे प्रकल्प अपूर्ण ...
जिल्ह्यात तुलनेने सिंचनाची प्रभावी सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकरी बारमाही पिके घेऊ शकत नाहीत. बांधकामाधीन १६ सिंचन लघुपाटबंधारे प्रकल्प अपूर्ण असण्यासोबतच अडाण नदीवर घोटाशिवणी, सत्तरसावंगा आणि बोरव्हा येथे बॅरेज निर्मितीचा प्रस्ताव आहे. मात्र, त्यास सुधारित प्रशासकीय मान्यता आवश्यक असून, ती अद्याप मिळालेली नाही. पैनगंगा नदीवर सहा बॅरेज उभारण्याची जुनी मागणी आहे. त्यातील कळमगव्हाण प्रकल्प रद्द झाला आहे. उर्वरित पाच बॅरेज उभारण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या चाचपणी करावी, अशी सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. तांत्रिक अडचणींमुळे मंगरूळपीर तालुक्यातील मंगळसा प्रकल्प रद्द करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्याऐवजी या प्रकल्पाची व्याप्ती कमी करून हा प्रकल्प उभारण्यात यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
...............
कोट :
जिल्ह्यातील बांधकामाधीन १६ सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करण्याचे सर्वंकष प्रयत्न सुरू आहेत. लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल. उपलब्ध प्रकल्पांमधून सिंचनाची गरज बहुतांश भागत आहे.
- प्रशांत बोरसे
कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, वाशिम