३०९ घरकुलांंचे काम अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:25 AM2021-07-22T04:25:44+5:302021-07-22T04:25:44+5:30

कारंजा नगरपरिषद मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर व उपमुख्याधिकारी सोपनील खामकर यांच्या मार्गदर्शनात सन २०१८-१९ या वर्षात ६५१ घरकुले करण्याचे ...

Work of 309 households is incomplete | ३०९ घरकुलांंचे काम अपूर्ण

३०९ घरकुलांंचे काम अपूर्ण

Next

कारंजा नगरपरिषद मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर व उपमुख्याधिकारी सोपनील खामकर यांच्या मार्गदर्शनात सन २०१८-१९ या वर्षात ६५१ घरकुले करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. एका घरकुलासाठी केंद्र सरकारकडून एक लाख रुपये व राज्य सरकारकडून दीड लाख रुपये असे एकूण अडीच लाख रुपये निधी मिळतो; मात्र राज्य सरकारकडून निधी पूर्ण प्राप्त झाला; मात्र केंद्र सरकारकडून फक्त ३४२ घरकुलांसाठी प्रत्येकी ६० हजार रुपये निधी प्राप्त झाला. या ३४२ लाभार्थ्यांना प्रत्येकी ४० हजार रुपयांच्या निधीची गरज आहे. तसेच ३०९ घरकुलाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना निधीअभावी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे निधी त्वरित उपलब्ध करून द्यावा अशी मागणी घरकूल लाभार्थीकडून होत आहे. यासंदर्भात घरकूल विभागाचे ए. आर. तायडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले केंद्र सरकारकडे निधीची मागणी केली आहे.

Web Title: Work of 309 households is incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.