आधी केले काम, मग लावला फलक
By admin | Published: April 30, 2017 07:04 PM2017-04-30T19:04:39+5:302017-04-30T19:04:39+5:30
शिरपूर जैन- शिरपूर-मालेगाव दरम्यान ९ किलोमीअर अंतराच्या रस्त्याची दुरुस्ती केल्यानंतर बांधकाम विभागाने संबंधित कामाची माहिती देणारा फलक शुक्रवारी या ठिकाणी लावला
बांधकाम विभागाचा प्रताप: मालेगाव-शिरपूर रस्त्याचे वास्तव
शिरपूर जैन: शासकीय निधीतून करण्यात येणाऱ्या कोणत्याही सार्वजनिक कामाची माहिती देणारा फलक काम सुरू करण्यापूर्वी लावणे आवश्यक असताना शिरपूर-मालेगाव दरम्यानच्या ९ किलोमीअर अंतराच्या रस्त्याची दुरुस्ती केल्यानंतर बांधकाम विभागाने संबंधित कामाची माहिती देणारा फलक शुक्रवारी या ठिकाणी लावला आहे.
केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत जिल्ह्यातील मालेगाव-शिरपूर-रिसोड या मार्गावरील शिरपूर-मालेगावदरम्यानच्या ९ किलोमीटर अंतराच्या रस्ता दुरुस्तीचे काम काही दिवसांपूर्वी करण्यात आले. केंद्र शासनाच्या २.८.०१४/१/२०१५ महराष्ट्र (६) दि. ८/३/२०१६ नुसार या रस्त्याच्या दुरुस्तीला प्रशासकीय मान्यता मिळाली. १३ कोटी १ लाख ४३ हजार ४३० रुपये तांत्रिक मान्यता असलेल्या कामाची स्विकृत निविदा किमंत १२ कोटी ३३ लाख ५८ हजार ७०१ रुपये अर्थात तांत्रिक मान्यतेपेक्षा कमी दराची होती. तथापि, सदर मार्ग तत्वता राष्ट्रीय मार्ग घोषीत झाल्यामुळे त्यापैकी केवळ ३ कोटी ४२ लाख रुपये किंमतीचे काम करणे निश्चित झाले. सदर मार्गाच्या दुरुस्तीचे काम मागील महिन्यात करण्यात आले. हे काम औरंगाबाद येथील मे. मापारी इन्फ्र ा प्रोजेक्ट प्रा. लिमिटेड यांनी केले आहे. हे काम करण्यापूर्वी कामाची माहिती देणारा फलक संबंधित जागेवर लावणे आवश्यक असताना काम पूर्ण झाल्यानंतर १० ते १५ दिवसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तेथे फलक लावला. उल्लेखनीय म्हणजे, सदर फलक तकलादू आणि कागदावर छपाई करून घेतलेला असल्याने काही दिवसांतच तो फाटून दिसेनासा होण्याची शक्यता आहे.