‘मी वाशिमकर’ ग्रुपच्या कार्याचे आढावा बैठकीत कौतूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 02:16 PM2019-05-29T14:16:29+5:302019-05-29T14:16:45+5:30

गृपच्या कार्याची  दखल घेत या ग्रुपला  २९ मे रोजी अमरावती येथे आयोजीत विभागीय वृक्ष लागवड आढावा बैठकीचे निमंत्रण पाठवून बोलावून घेतले.

Work of 'I Washimkar' Group appreciated in the meeting | ‘मी वाशिमकर’ ग्रुपच्या कार्याचे आढावा बैठकीत कौतूक!

‘मी वाशिमकर’ ग्रुपच्या कार्याचे आढावा बैठकीत कौतूक!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  विविध सामाजिक उपक्रमात अग्रस्थानी असलेल्या ‘मी वाशिमकर ग्रुप'ने वाशिम शहर ग्रीन सिटी करण्यासाठी वृक्ष लावून जगविण्याचा संकल्प केला. या उपक्रमाच्या शिस्तबध्द नियोजनामुळे वाढता लोकसहभाग पाहता  या विधायक कामाची माहिती राज्याचे वनमंत्र्यांपर्यंत पोहचली. राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या गृपच्या कार्याची  दखल घेत या ग्रुपला  २९ मे रोजी अमरावती येथे आयोजीत विभागीय वृक्ष लागवड आढावा बैठकीचे निमंत्रण पाठवून बोलावून घेतले. या गृपच्यावतिने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे कौतूक करीत असे कार्याची आज गरजच असल्याचे सांगितले. 
शहरातील उत्साही युवकांनी तयार केलेल्या ‘मी वाशिमकर ग्रुप' माध्यमातून विविध समाजपयोगी कामांचा विडा उचलला. शहरातील तलावांची स्वच्छता, स्वच्छता अभियान, प्लास्टिक निर्मूलन, यासारख्या विविध समाजपयोगी उपक्रम राबविल्यानंतर शहर हिरवेगार करण्यासाठी हा गृप सरसावला. त्या दिशेने कार्यास प्रारंभ केला, पाहता पाहला लोक जुळत गेली व ही एक चळवळ झाली. या चळवळीची माहिती दूरपर्यंत पोहचली. वनमंत्र्यांना याची माहिती झाल्याबरोबर त्यांनी विभागीय आढावा बैठकीस येण्याचे आमंत्रण दिले. या बैठकीस सर्वांना जाणे शक्य नसल्याने प्रतिनिधी म्हणून अ‍ॅड. टेकाडे, मनिष मंत्री व खंडाळकर यांनी उपस्थिती दर्शविली. तेथे या गृपच्या कार्याचे कौतूक होवून यांनी सुरु केलेले कार्याची माहिती घेवून तश्याप्रकारे नागरिक कसे जुळतील याकडे लक्ष देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.  वाशिमचे जिल्हाधिकारी यांनी आपल्या भाषणात वाशिमकर गृृप राबवित असलेल्या कार्याची माहिती देवून त्यांचे कौतूक केले.
मी वाशिमकर गृपने घेतलेले कार्य यशस्वीतेसाठी संपूर्ण शहरवासीयांचे योगदान लाभत आहे. यामुळे या गृपचे मनोबल वाढत असल्याचे सदस्यांमध्ये बोलल्या जात आहे.

Web Title: Work of 'I Washimkar' Group appreciated in the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.