कारंजा-मानोरा मार्गाचे काम वेगात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:21 AM2021-02-05T09:21:29+5:302021-02-05T09:21:29+5:30
---------- इंझोरीत कोरोना चाचणी इंझोरी: गेल्या ९ दिवसांपूर्वी इंझोरी येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. जवळपास दोन महिन्यांनी येथे ...
----------
इंझोरीत कोरोना चाचणी
इंझोरी: गेल्या ९ दिवसांपूर्वी इंझोरी येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. जवळपास दोन महिन्यांनी येथे कोरोना रुग्ण आढळून आल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कुपटा आरोग्य वर्धिनी केंद्रांतर्गत इंझोरी उपकेंद्राकडून गावात कोरोना चाचणीला सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामस्थांना माहिती देण्याचे आवाहन डॉ. सुधीर खिराडे यांनी सोमवारी केले.
-----------------
तलाव दुरुस्तीसाठी पुढाकार
इंझोरी: येथून जवळच असलेल्या जामदरा येथील सिंचन तलावाच्या दुरुस्तीसाठी जि.प. सदस्यांनी नियोजन समितीकडे ५० लाखांच्या निधीचा प्रस्ताव सादर केल्यानंतर आता आमदार राजेंद्र पाटणींनीही या तलावाच्या दुरुस्तीसाठी पुढाकार घेतला असून, यासंदर्भात विधानसभेत तारांकित प्रश्नाची सूचना १ फेब्रुवारीला केली आहे.
---------
पीएम किसान अंतर्गत माहितीचे संकलन
पोहरादेवी: केंद्रशासनाकडून शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी सादर केलेल्या माहितीमध्ये त्रुटी आढळून येत आहेत. ही त्रुटी दुरुस्त करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले असून, पोहरादेवी परिसरात तलाठ्यांनी सोमवारी शेतकऱ्यांच्या माहितीचे संकलन केले.
===Photopath===
010221\01wsm_1_01022021_35.jpg
===Caption===
कारंजा-मानोरा मार्गाचे काम वेगात