मालेगाव तालुक्यातील नाला खोलीकरणाची कामे वेगात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 02:56 PM2018-12-31T14:56:25+5:302018-12-31T14:56:55+5:30
मालेगाव (वाशिम) : राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या सामंजस्य करारातून राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत मालेगाव तालुक्यात नाला खोलीकरणाची कामे वेगाने करण्यात येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) : राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या सामंजस्य करारातून राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत मालेगाव तालुक्यात नाला खोलीकरणाची कामे वेगाने करण्यात येत आहेत. या अंतर्गत सोमवारी खिरडा येथे नाला खोलीकरणाच्या कामाचे उद्घाटन तहसीलदार राजेश वजिरे यांच्या हस्ते करण्यात आले.
वाशिम जिल्हा दुष्काळमूक्त करण्याच्या उद्देशाने प्रशासन आणि बीजेएसच्या संयुक्त प्रयत्नांतून जिल्ह्यात नाला खोलीकरण, नदी खोलीकरण, साठवण तळे, खोल समतल चर, गाळ काढणे आदि कामे करण्यात येत आहेत. यात मालेगाव तालुक्यात साठवण तळ्यासह नाला खोलीकरण आणि समतल चरांचे काम सुरू असून, चिवरा येथील साठवण तळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले, तर सखोल समतल चरांचे कामही शेवटच्या टप्प्यात आहे. आता तालुक्यात नाला खोलीकरणाची कामे वेगाने करण्यात येत असून, या अंतर्गत कुरळा येथे नाला खोलीकरणाचे काम वेगाने करण्यात येत असतानाच सोमवार ३१ डिसेंबर रोजी तालुक्यातील खिरडा येथे नाला खोलीकरणाच्या कामाला तहसीलदार राजेश वजिरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी नितिन काळे, बीजेएसचे तालुका समन्वयक वैभव किर्तनकार, गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी मंडळीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.