नऊ हजार सिंचन विहिरींची कामे रखडली

By admin | Published: April 26, 2017 02:13 PM2017-04-26T14:13:44+5:302017-04-26T14:13:44+5:30

जिल्ह्यातील तब्बल नऊ हजार ६४६ सिंचन विहिरींची कामे रखडली आहेत. याशिवाय ३३९३ नवीन सिंचन विहिरींच्या कामांना अद्याप प्रारंभही झाला नाही.

The work of nine thousand irrigation wells | नऊ हजार सिंचन विहिरींची कामे रखडली

नऊ हजार सिंचन विहिरींची कामे रखडली

Next

वाशिम - विविध कारणांमुळे जिल्ह्यातील तब्बल नऊ हजार ६४६ सिंचन विहिरींची कामे रखडली आहेत. याशिवाय ३३९३ नवीन सिंचन विहिरींच्या कामांना अद्याप प्रारंभही झाला नाही.
मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच विविध प्रकाराची विकासात्मक कामे मार्गी लावण्यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले जाते. गत पाच वर्षात हजारो सिंचन विहिरी या योजनेतून मंजूर झालेल्या आहेत. सन २०१६-१७ या वर्षात ४४४८ नवीन सिंचन विहिरींचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी आतापर्यंत केवळ १०५५ सिंचन विहिरींच्या कामांना सुरूवात झाली. उर्वरीत कामे अद्यापही सुरू होऊ शकली नाहीत. तसेच यापूवीर्चीही ९६४६ कामे अपूर्ण आहेत. गतवर्षी सिंचन विहिरींच्या प्रश्नांवरून काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले होते. या आदेशामुळे प्रशासकीय पातळीवर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर सिंचन विहिरींच्या कामाने गती घेतली होती. मात्र, त्यानंतर आता पुन्हा सिंचन विहिरींची कामे रखडत असल्याचे दिसून येते. मजुरांअभावी सिंचन विहिरींची कामे प्रभावित झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Web Title: The work of nine thousand irrigation wells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.