वाशिम जिल्ह्यातील पांदण रस्त्यांची कामे अपूर्णच; शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 04:29 PM2018-06-17T16:29:19+5:302018-06-17T16:29:19+5:30
वाशिम - पावसाळ्याला सुरूवात झाली असली तरी जिल्ह्यातील पांदण रस्त्यांची कामे पूर्ण झाली नसल्याचे दिसून येते. मजबूत असा पांदण रस्ता नसल्याने शेतकºयांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
वाशिम - पावसाळ्याला सुरूवात झाली असली तरी जिल्ह्यातील पांदण रस्त्यांची कामे पूर्ण झाली नसल्याचे दिसून येते. मजबूत असा पांदण रस्ता नसल्याने शेतकºयांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
प्रत्येक शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता तयार करण्यासाठी पालकमंत्री शेत, पाणंद रस्ते योजना राबविण्यात येते. याकरिता जिल्ह्यातील ग्राम पंचायतींकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील तालुकास्तरीय समितीने हे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हास्तरीय समितीकडे पाठविले. आतापर्यंत ४७० पेक्षा अधिक प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे प्राप्त झाले. यापैकी अर्ध्यापेक्षा अधिक रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. शेत, पाणंद रस्ते हे शेतकºयांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत. हे रस्ते झाल्यास पावसाळ्यात शेतकºयांची होणारी गैरसोय थांबेल. त्यामुळे या रस्त्यांच्या कामांसाठी संबंधित विभागांनी मिशन मोडवर काम करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणेला दिल्या होत्या. तथापि, अर्धीअधिक कामे अपूर्ण असल्याने शेतकºयांना शेतात जाताना गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे. शेतरस्ता तसेच पांदण रस्त्यांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली.